दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

बोधकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोधकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

८/३०/२०२१

बोधकथा / दुधाचा ग्लास

 

दुधाचा ग्लास

 

              एक छोटा मुलगा घरोघर लहानसहान वस्तू विकत फिरत असे. आपल्या आईला मदत व्हावी व शाळेचा खर्च भागवण्यासाठी तो मिळेल ते काम आनंदाने करत असे. एके दिवशी असाच तो वस्तू विकण्यासाठी उन्हातान्हात फिरत होता. न जेवताच घरातून बाहेर पडल्याने त्याला खूप थकल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे एखाद्या घरी काही खायला मागून बघावे असे त्याने ठरवले. एका घरासमोर थांबून त्याने दाराची बेल वाजवली. एका मुलीने दार उघडले.मुलाने पिण्यासाठी ग्लासभर पाणी मागितले.त्याची अवस्था बघून मुलीने मोठ्ठा ग्लास भरून दूध आणून मुलाला दिले. भुकेने व्याकूळ झालेल्या मुलाला दुधाचे पैसे कसे चुकवावे हा प्रश्न पडला. परंतु ती तरुणी म्हणाली, 'मला याचे पैसे नकोत.' तिचे मनापासून आभार मानून तो तेथून निघून गेला.

         या प्रसंगानंतर अनेक वर्षे लोटली. ती मुलगी मोठी झाली. अचानक ती आजारी पडली व तिला एका असाध्य रोगाने ग्रासले. तिच्या घरच्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले. परंतु तिच्या तब्येतीत काही सुधारणा होईना.शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमधे तिलाअँडमिट करण्यात आले. तेथील डॉक्टर हे सुप्रसिद्ध व सर्वात महागडे होते. त्यांनी त्या तरुणीवर योग्य उपचार केले. तिचा आजार हळूहळू बरा होऊ लागला. परंतु डॉक्टरांची मोठ्या रकमेची फी कशी चुकवावी या विवंचनेत ती तरुणी होती. तिच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नाहीत हे तिलाही माहीत होते.अनेक महिन्यांच्या उपचारानंतर त्या मुलीच्या हाती हॉस्पिटलचे बिल देण्यात आले. तिच्या आवाक्याबाहेरील रकमेचे बिल खोडून ने कॅन्सल केलेले होते व त्या खाली डॉक्टरांच्या सहीजवळ लिहिलेले होते, ‘ग्लासभर दुधाने तुमचे बिल खूप वर्षांपूर्वीच चुकते केलेले आहे.' तो छोटा मुलगा म्हणजेच आपल्याला बरे करणारे आहेत हे बघून त्या तरुणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मुलांनो,कुठल्याही स्वार्थाशिवाय केलेले चांगले काम कधीही वाया जात नाही, म्हणून निःस्वार्थपणे चांगली कामे करत राहावे.



गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

८/१९/२०२१

बोधकथा / धीटपणा

 बोधकथा / धीटपणा

          मला पोहता येत नव्हते. आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे शाम " पोहायला शिक. ती लहान-लहान मुले पोहतात आणि तुला कसली रे भीती? मुलीसुद्धा शिकल्या तू मात्र भित्रा! उद्या शिकायला जा हो !" मी लपून बसत असे.

                 एके दिवशी मुलांनी मला माळ्यावरून ओढून आणले. मी पोहायला जात नाही हे पाहून आईला भारी राग आला. ती मला शिपढीने मारू लागली. आई, मी मेलो!" असे मी ओरडू लागलो. आई म्हणाली, "काही मरत नाहीस! लाज नाही वाटत लपून बसायला? चांगला बुडवा रे याला." अखेर मी विहिरीवर गेलो. काठावर उभा राहिलो. पण उडी मारण्याचे धैर्य होईना. अखेर कोणीतरी मागून मला ढकलले मी गटांगळ्या खाऊ लागलो. बाळूने मला सावरले.तो मला पोहण्याचे धडे देऊ लागला. दुसरे वेळी मी स्वतःच उडी मारली माझा धीर चेपला. घरी आलो. आईने गोड हाक मारली, "शाम मी गेलो नाही. तशी जेवण टाकून ती उठली. "शाम, तुला जगाने भित्री भागूबाई म्हणावे का? नाही ना?" मग मारामुळे उठलेल्या वळांना तिने तेल लावले." ती म्हणाली, चांगला धीट हो. मुले घीट असावीत. भित्री नसावीत. " 

                                                                               -सानेगुरुजी



साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि प्रतिभावान लेखक होते.

जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९

जन्मस्थळ : रत्नागिरी

मृत्युदिनांक : 11 जून,१९५०

मृत्यूस्थल : किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई

चित्रपट : श्यामची आई

शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय

८/१९/२०२१

बोधकथा / खोटेपणा

बोधकथा / खोटेपणा

             गावात कुठे जेवणावळ असली की आम्हाला बोलावणे असायचेच. पंगतीत आम्ही श्लोक म्हणावेत म्हणून वडील मानेनेच खूण करीत. मी फार लाजाळू होतो. पण वडील बाहेरगावी गेले होते. जेवायला मीच गेलो. मुकाट्याने मान खाली घालून जेवायला लागलो.मुलांनी श्लोक म्हणायचा सपाटा लावला. त्यांनी मलाही आग्रह केला. पण मी म्हटला नाही. घरी येऊन आईला मात्र सांगितले, आई, मी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, हा श्लोक म्हटला व लोकांना आवडला." मी हे खोटेच सांगत असतांना इतर मुले आली. त्यांनी माझे बिंग फोडले. "यशोदा काकू, तुमच्या शामने आज श्लोक म्हंटला नाही." आई रागावली. म्हणाली, "शाम, तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास ही दुसरी चूक, जा देवाच्या पाया पड आणि म्हण मी पुन्हा खोटे कधी बोलणार नाही." वडील घरी येताच आईने माझा खोटेपणा त्यांनाही सांगितला. ते खूपच रागावले. मी म्हणालो, 'चुकलो. क्षमा करा.

             - सानेगुरुजी



साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि प्रतिभावान लेखक होते.

जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९

जन्मस्थळ : रत्नागिरी

मृत्युदिनांक : 11 जून,१९५०

मृत्यूस्थल : किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई

चित्रपट : श्यामची आई

शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय

८/१९/२०२१

बोधकथा /चांगली बुद्धी

 बोधकथा /चांगली बुद्धी


                                संध्याकाळी खेळून आलो की मी आंघोळ करीत असे. आई गंगाळात पाणी आणून देई. एके दिवशी मी असाच आंघोळीला बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती, जवळच विहीर होती. आईने अंग खसाखसा चोळून दिले. नंतर मी उरलेले पाणी अंगावर घेतले. पाणी संपले व मी आईला हाका मारू लागलो. आईने अंग  पुसले. मी म्हणालो, "तळवे ओले आहेत, तुझ्या पातळाचे ओचे धोंडीवर | पसर. मी पाय टेकून घेईन म्हणजे पायाना | माती चिकटणार नाही. मला नाही आवडत ओल्या पायांना माती | लागलेली." आई हसली. तिने तिचे ओचे 'धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्याच्यावर ठेवून तळवे पुसले. मी घरात गेलो, देवापुढे बसलो. आई निरंजन घेऊन आली व म्हणाली, "शाम पायाला घाण लागू नये म्हणून " जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग तशी शुद्ध बुद्धी दे म्हणून. " - सानेगुरुजी



साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि प्रतिभावान लेखक होते.

जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९

जन्मस्थळ : रत्नागिरी

मृत्युदिनांक : 11 जून,१९५०

मृत्यूस्थल : किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई

चित्रपट : श्यामची आई

शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय

८/१९/२०२१

बोधकथा / स्वाभिमान

 बोधकथा / स्वाभिमान

           मला वाचनाचा नाद होता. पण चांगली पुस्तके विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे हाती पैसे आले तर आनंद वाटे. जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यायचे नसते. घेण्याचा अधिकार आहे फक्त भिक्षुक ब्राम्हणाला. लग्नप्रसंगी दोन्ही पक्षाकडील उपाध्याय दक्षिणा देत मंडपात हिंडतात. एके ठिकाणच्या लग्नात मी हात पुढे केला आणि दोन आणे मिळवले. मोठ्या आनंदाने आईला पैसे मी दाखवले. ते पैसे शेवंतीचे वेळचे दक्षिणेचे आहेत हे कळताच ती ओशाळली. ती म्हणाली, "शाम आपण गरीब असलो तर गृहस्थ आहोत. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण स्वाभिमान बाळगावा. स्वाभिमान म्हणजे जीवन, आणि मिंधेपणा म्हणजे मरण. आईने ते दोन आणे बाळू गड्याला देऊन टाकले. या प्रसंगावरून मी बरेच शिकलो. "जगापासून जितके आम्ही घेऊ तितके आपण जगाचे मिंधे. होत असतो. दीनवाणे जगणे हे पापच आहे. स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच अंगी बाणवावी. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला काही देऊ नये"



साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि प्रतिभावान लेखक होते.

जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९

जन्मस्थळ : रत्नागिरी

मृत्युदिनांक : 11 जून,१९५०

मृत्यूस्थल : किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई

चित्रपट : श्यामची आई

शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय

८/१९/२०२१

बोधकथा / भूतदया

 बोधकथा / भूतदया

                   अंगणात एक उंचच उंच झाड होते. आम्ही खेळत होतो. एकाएकी टप् असा आवाज झाला. मी व माझा भाऊ दोघेही पाहू लागलो. ते एक पाखराचे लहानसे पिल्लू होते. त्याची छाती धडधडत होती. त्याला नीट पंख फुटले नव्हते. आम्ही एका फडक्यात गुंडाळून त्या पिल्लाला घरात नेले. आम्ही त्या पिल्लावर प्रेम करू लागलो. "माझ्या मित्रा, तू बरा हो. आम्ही तुला पिंजऱ्यात ठेवणार नाही. तू तुझ्या आईकडे उडून जा.'आमच्या या बोलण्याकडे त्या पाखराचे लक्ष नव्हते.आई म्हणाली, "शाम ते जगणर नाही. त्याला, सुखाने मरू दे.फार उंचावरून पडले बिचारे." पिल्लू लवकरच देवाघरी गेले. शेवंती आणि मोगरा यांच्या झाडांमध्ये आम्ही खळगा खणला.पिलाला त्यात पुरले. माती लोटताना अश्रू अनावर झाले. आम्ही घरात आलो आणि रडत बसलो. आईने ते पाहिले. ती म्हणाली,"शाम, तुम्हीं त्या पाखरावर प्रेम केलंत. त्याला भूतदया म्हणतात या मुक्या प्राण्यांना आपली दुःखे सांगता येत नाहीत. त्यांना कधीही कष्ट देऊ नये. त्यांच्यावर प्रेम करावे. तसेच भावंडावरहा

करावे. "                                    - सानेगुरुजी

बोध- मुक्या प्राण्यावर प्रेम करावे.

 


साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि प्रतिभावान लेखक होते.

जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९

जन्मस्थळ : रत्नागिरी

मृत्युदिनांक : 11 जून,१९५०

मृत्यूस्थल : किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई

चित्रपट : श्यामची आई

शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय

८/१९/२०२१

बोधकथा /प्रेम

 बोधकथा /प्रेम


             देवीच्या रोगातून बरा होऊन माझा मोठा भाऊ घरी आला.देवीच्या आजारात अंगात उष्णता फार वाढते. आईने गुळाचा कांदेपाक केला. मोठ्या भावाला ती रोज दोन तीन कांदे देऊ लागली. मला त्याचा हेवा वाढला. मी म्हणालो, "आई, दादा तुझा आवडता! त्याला रोज कांदेपाक, आम्हाला कोण विचारतो ? मला, देवी आल्या असत्या तर किती बरं झालं असतं!" आईला खूपचवाईट वाटलं. ती म्हणाली, "भावाचा का असा मत्सरं करावा?शाम, तुला राम लक्ष्मण, भरत यांचं बंधुप्रेम ठाऊक आहे ना? अरे,परका जरी आजारी असला तरी त्याला प्रेम द्यावं. दादा तर तुझा सख्खा भाऊ असं नको बरं करूस पुन्हा.दुर्वाच्या आजीनं रात्री गाणं म्हटलं, "द्रौपदी बंधु शोभे नारायण" आईने गोष्ट सांगितली, "कृष्णाचं द्रौपदीवर आणि तिचं कृष्णावर फार प्रेम होतं. स्वतःच्या बहिणीपेक्षा कृष्णाने मानलेल्या बहिणीवर अधिक प्रेम का करावे? नारदाच्या या शंकेवर कृष्णाने तोडगा सुचवला. "नारदा, माझं बोट कापलं असं सांगून तू सुभद्रेकडे आणि नंतर द्रोपदीकडे जा आणि चिंधी माग,"नारद गेले. सुभद्रेकडे चिंधी मिळाली नाही. द्रौपदीर्न मात्र कोणताही विचार न करता पैठणी फाडून दिली. नारदाचे शंका निरसन झाले. "आईच्या गोष्टीने माझे डोळे उघडले. मी दादाची क्षमा मागितली. आई म्हणाली, "भावंडानी असंच प्रेम करावं, पुढं या प्रेमाने विश्वबंधुत्वाची जागा घ्यावी.".

                                                                                  - सानेगुरुजी

साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि प्रतिभावान लेखक होते.

जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९

जन्मस्थळ : रत्नागिरी

मृत्युदिनांक : 11 जून,१९५०

मृत्यूस्थल : किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई

चित्रपट : श्यामची आई

शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय