बोधकथा / भूतदया
अंगणात एक उंचच उंच झाड होते.
आम्ही खेळत होतो. एकाएकी टप् असा आवाज झाला. मी व माझा भाऊ दोघेही पाहू लागलो. ते
एक पाखराचे लहानसे पिल्लू होते. त्याची छाती धडधडत होती. त्याला नीट पंख फुटले
नव्हते. आम्ही एका फडक्यात गुंडाळून त्या पिल्लाला घरात नेले. आम्ही त्या पिल्लावर
प्रेम करू लागलो. "माझ्या मित्रा,
तू बरा हो. आम्ही तुला पिंजऱ्यात ठेवणार नाही. तू तुझ्या आईकडे उडून
जा.'आमच्या या बोलण्याकडे त्या पाखराचे लक्ष नव्हते.आई
म्हणाली, "शाम ते जगणर नाही. त्याला, सुखाने मरू दे.फार उंचावरून पडले बिचारे." पिल्लू लवकरच देवाघरी
गेले. शेवंती आणि मोगरा यांच्या झाडांमध्ये आम्ही खळगा खणला.पिलाला त्यात पुरले.
माती लोटताना अश्रू अनावर झाले. आम्ही घरात आलो आणि रडत बसलो. आईने ते पाहिले. ती
म्हणाली,"शाम, तुम्हीं त्या
पाखरावर प्रेम केलंत. त्याला भूतदया म्हणतात या मुक्या प्राण्यांना आपली दुःखे
सांगता येत नाहीत. त्यांना कधीही कष्ट देऊ नये. त्यांच्यावर प्रेम करावे. तसेच
भावंडावरहा
करावे. " - सानेगुरुजी
बोध- मुक्या प्राण्यावर
प्रेम करावे.
साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि
प्रतिभावान लेखक होते.
जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९
जन्मस्थळ : रत्नागिरी
मृत्युदिनांक : 11
जून,१९५०
मृत्यूस्थल : किंग
एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई
चित्रपट : श्यामची
आई
शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट
महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय
