बोधकथा /चांगली बुद्धी
संध्याकाळी
खेळून आलो की मी आंघोळ करीत असे. आई गंगाळात पाणी आणून देई. एके दिवशी मी असाच
आंघोळीला बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती,
जवळच विहीर होती. आईने अंग खसाखसा चोळून दिले. नंतर मी उरलेले पाणी
अंगावर घेतले. पाणी संपले व मी आईला हाका मारू लागलो. आईने अंग पुसले. मी म्हणालो, "तळवे ओले आहेत, तुझ्या पातळाचे ओचे धोंडीवर |
पसर. मी पाय टेकून घेईन म्हणजे पायाना | माती
चिकटणार नाही. मला नाही आवडत ओल्या पायांना माती | लागलेली."
आई हसली. तिने तिचे ओचे 'धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्याच्यावर
ठेवून तळवे पुसले. मी घरात गेलो, देवापुढे बसलो. आई निरंजन
घेऊन आली व म्हणाली, "शाम पायाला घाण लागू नये म्हणून
" जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग तशी शुद्ध
बुद्धी दे म्हणून. " - सानेगुरुजी
साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि
प्रतिभावान लेखक होते.
जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९
जन्मस्थळ : रत्नागिरी
मृत्युदिनांक : 11
जून,१९५०
मृत्यूस्थल : किंग
एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई
चित्रपट : श्यामची
आई
शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट
महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय
