बोधकथा / धीटपणा
मला पोहता येत नव्हते. आई पुष्कळ वेळा
म्हणे, “अरे शाम " पोहायला
शिक. ती लहान-लहान मुले पोहतात आणि तुला कसली रे भीती? मुलीसुद्धा शिकल्या तू मात्र भित्रा! उद्या
शिकायला जा हो !" मी लपून बसत असे.
एके दिवशी मुलांनी मला माळ्यावरून ओढून आणले. मी पोहायला जात नाही हे पाहून आईला भारी राग आला. ती मला शिपढीने मारू लागली. “आई, मी मेलो!" असे मी ओरडू लागलो. आई म्हणाली, "काही मरत नाहीस! लाज नाही वाटत लपून बसायला? चांगला बुडवा रे याला." अखेर मी विहिरीवर गेलो. काठावर उभा राहिलो. पण उडी मारण्याचे धैर्य होईना. अखेर कोणीतरी मागून मला ढकलले मी गटांगळ्या खाऊ लागलो. बाळूने मला सावरले.तो मला पोहण्याचे धडे देऊ लागला. दुसरे वेळी मी स्वतःच उडी मारली माझा धीर चेपला. घरी आलो. आईने गोड हाक मारली, "शाम मी गेलो नाही. तशी जेवण टाकून ती उठली. "शाम, तुला जगाने भित्री भागूबाई म्हणावे का? नाही ना?" मग मारामुळे उठलेल्या वळांना तिने तेल लावले." ती म्हणाली, चांगला धीट हो. मुले घीट असावीत. भित्री नसावीत. "
-सानेगुरुजी
साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि
प्रतिभावान लेखक होते.
जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९
जन्मस्थळ : रत्नागिरी
मृत्युदिनांक : 11
जून,१९५०
मृत्यूस्थल : किंग
एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई
चित्रपट : श्यामची
आई
शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट
महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय
