Personality Development
४/१०/२०२१
Personality Development (व्यक्तिमत्व विकास-संवाद )
उत्तम संवादातून साधा यशस्वी होण्याचा मार्ग
मित्रांनो ,सुसंवादासाठी यशस्वी होण्यासाठी भाषेला खूप महत्त्व आहे. किंबहुना भाषाच संवादामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्याकडे १५ कोसावर भाषा बदलते त्यामुळे प्रत्येक गावाचा भाषेचा उच्चार वेगळा असतो.असे असले तरी संवादांमध्ये प्रमाण भाषेला महत्त्व आहे. भाषेचा अभ्यास कसा करावा तसेच विचारांची स्पष्टता कशी मिळवावी हे आपण जाणून घेतले आहे .संवादात स्वर आणि पद्धत हे देखील महत्त्वाचे आहे. बोलतांना आपला स्वर आणि पद्धत कशी आहे यावर बोलण्याचा प्रभाव अवलंबून असतो.काही लोकांना खूप जोरात बोलायची सवय असते,तर काही अतिशय हळू आवाजात बोलत असतात.काही दडवण्याचा स्वरात बोलत असतात. काहींना अतिशय पाल्हाळ लावत ,मुरके घेत किंवा लाडेलाडे बोलण्याची सवय असते. काहींच्या बोलण्यात कधीकधी अहंभाव जाणवत असतो. म्हणजे मी अतिशय ग्रेट आहे ,मलाच खूप माहिती आहे.असा आविर्भाव असतो काहींच्या बोलण्यात इतरांबद्दल तुच्छता जाणवत असते.या सगळ्या गोष्टी आपला संवाद यशस्वी होण्यास साहाय्य करत असतात. म्हणूनच बोलताना आपली भाषा आणि उच्चार याबरोबरच स्वर आणि पद्धत महत्त्वाची असते. बोलतांना आपला स्वर मृदू असावा आणि पद्धत सहज सोपी असावी . सॉफ्ट आवाजात बोलण्यावर समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे ऐकावेसे वाटते आणि मग अपेक्षित परिणाम साधला जातो.आवाजात ऋजुता असावी असे म्हणतात.आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीशी आदराने बोलले पाहिजे.कारण आपण समोरच्याला आदर दिला तर समोरची व्यक्ती आपला आदर करते.सर,मॅडम असे आदरपूर्वक बोलणे अपेक्षित परिणाम साधू शकते.आपले बोलण्यातले चढ-उतार आपले हावभाव देहबोली यावर ही संवादाची परिणामकारकता अवलंबून असते.विचित्र हावभाव किंवा अनावश्यक हातवारे संवाद घडवण्यास कारणीभूत ठरू शकतात. याचा अर्थ असा नाही की आपण नाटकीी बोलावे. आपल्या बोलण्यात जरब, दरारा असायला हवा पण तो गरजेनुसार असावा.प्रसंगानुरूप आपल्याला बोलण्याच्या पद्धतीत आवश्यक तो बदल करता यायला हवा.

