बोधकथा / खोटेपणा
गावात कुठे जेवणावळ असली की आम्हाला
बोलावणे असायचेच. पंगतीत आम्ही श्लोक म्हणावेत म्हणून वडील मानेनेच खूण करीत. मी
फार लाजाळू होतो. पण वडील बाहेरगावी गेले होते. जेवायला मीच गेलो. मुकाट्याने मान
खाली घालून जेवायला लागलो.मुलांनी श्लोक म्हणायचा सपाटा लावला. त्यांनी मलाही
आग्रह केला. पण मी म्हटला नाही. घरी येऊन आईला मात्र सांगितले, “आई, मी
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, हा श्लोक
म्हटला व लोकांना आवडला." मी हे खोटेच सांगत असतांना इतर मुले आली. त्यांनी
माझे बिंग फोडले. "यशोदा काकू, तुमच्या शामने आज श्लोक
म्हंटला नाही." आई रागावली. म्हणाली, "शाम,
तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास ही दुसरी चूक,
जा देवाच्या पाया पड आणि म्हण मी पुन्हा खोटे कधी बोलणार
नाही." वडील घरी येताच आईने माझा खोटेपणा त्यांनाही सांगितला. ते खूपच
रागावले. मी म्हणालो, 'चुकलो. क्षमा करा.
- सानेगुरुजी
साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि
प्रतिभावान लेखक होते.
जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९
जन्मस्थळ : रत्नागिरी
मृत्युदिनांक : 11
जून,१९५०
मृत्यूस्थल : किंग
एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई
चित्रपट : श्यामची
आई
शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट
महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय
