दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

बोधकथा /प्रेम

 बोधकथा /प्रेम


             देवीच्या रोगातून बरा होऊन माझा मोठा भाऊ घरी आला.देवीच्या आजारात अंगात उष्णता फार वाढते. आईने गुळाचा कांदेपाक केला. मोठ्या भावाला ती रोज दोन तीन कांदे देऊ लागली. मला त्याचा हेवा वाढला. मी म्हणालो, "आई, दादा तुझा आवडता! त्याला रोज कांदेपाक, आम्हाला कोण विचारतो ? मला, देवी आल्या असत्या तर किती बरं झालं असतं!" आईला खूपचवाईट वाटलं. ती म्हणाली, "भावाचा का असा मत्सरं करावा?शाम, तुला राम लक्ष्मण, भरत यांचं बंधुप्रेम ठाऊक आहे ना? अरे,परका जरी आजारी असला तरी त्याला प्रेम द्यावं. दादा तर तुझा सख्खा भाऊ असं नको बरं करूस पुन्हा.दुर्वाच्या आजीनं रात्री गाणं म्हटलं, "द्रौपदी बंधु शोभे नारायण" आईने गोष्ट सांगितली, "कृष्णाचं द्रौपदीवर आणि तिचं कृष्णावर फार प्रेम होतं. स्वतःच्या बहिणीपेक्षा कृष्णाने मानलेल्या बहिणीवर अधिक प्रेम का करावे? नारदाच्या या शंकेवर कृष्णाने तोडगा सुचवला. "नारदा, माझं बोट कापलं असं सांगून तू सुभद्रेकडे आणि नंतर द्रोपदीकडे जा आणि चिंधी माग,"नारद गेले. सुभद्रेकडे चिंधी मिळाली नाही. द्रौपदीर्न मात्र कोणताही विचार न करता पैठणी फाडून दिली. नारदाचे शंका निरसन झाले. "आईच्या गोष्टीने माझे डोळे उघडले. मी दादाची क्षमा मागितली. आई म्हणाली, "भावंडानी असंच प्रेम करावं, पुढं या प्रेमाने विश्वबंधुत्वाची जागा घ्यावी.".

                                                                                  - सानेगुरुजी

साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि प्रतिभावान लेखक होते.

जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९

जन्मस्थळ : रत्नागिरी

मृत्युदिनांक : 11 जून,१९५०

मृत्यूस्थल : किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई

चित्रपट : श्यामची आई

शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय