बोधकथा / स्वाभिमान
मला वाचनाचा नाद होता. पण चांगली पुस्तके
विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे हाती पैसे आले तर आनंद वाटे. जो गृहस्थ असतो
त्याने दक्षिणा घ्यायचे नसते. घेण्याचा अधिकार आहे फक्त भिक्षुक ब्राम्हणाला.
लग्नप्रसंगी दोन्ही पक्षाकडील उपाध्याय दक्षिणा देत मंडपात हिंडतात. एके ठिकाणच्या
लग्नात मी हात पुढे केला आणि दोन आणे मिळवले. मोठ्या आनंदाने आईला पैसे मी दाखवले.
ते पैसे शेवंतीचे वेळचे दक्षिणेचे आहेत हे कळताच ती ओशाळली. ती म्हणाली, "शाम आपण गरीब असलो तर गृहस्थ आहोत.
भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण स्वाभिमान बाळगावा. स्वाभिमान म्हणजे जीवन,
आणि मिंधेपणा म्हणजे मरण. आईने ते दोन आणे बाळू गड्याला देऊन टाकले.
या प्रसंगावरून मी बरेच शिकलो. "जगापासून जितके आम्ही घेऊ तितके आपण जगाचे
मिंधे. होत असतो. दीनवाणे जगणे हे पापच आहे. स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच अंगी
बाणवावी. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला काही देऊ
नये"
साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि
प्रतिभावान लेखक होते.
जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९
जन्मस्थळ : रत्नागिरी
मृत्युदिनांक : 11
जून,१९५०
मृत्यूस्थल : किंग
एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई
चित्रपट : श्यामची
आई
शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट
महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय
