धार्मिक समन्वय /7 वी/ इतिहास /Test-1
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
आपल्या इतिहासातील गमतीशीर महत्व पूर्ण गोष्टी
माहीत आहे का तुम्हांला ?
१) महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना पुढीलप्रमाणे आहे म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा 'लीळाचरित्र' हा ग्रंथ, आय
मराठी कवयित्री महदंबा यांचे 'धवळे', केशोबास यांनी संपादित केलेले 'सूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ', दामोदर पंडितांचे ‘वच्छाहरण’, भास्करभट्ट
बोरीकर यांचा 'शिशुपालवध', नरेंद्रांचे
'रुक्मिणीस्वयंवर'.
_________________
____________________________
२) महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान
यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत शेख महंमद
यांचे 'शेख महंमद अविंध । त्याचे हृदयी गोविंद ।।' हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण होय.
