दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

सातवी इतिहास ऑनलाईन टेस्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सातवी इतिहास ऑनलाईन टेस्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३० जानेवारी, २०२२

बुधवार, २ जून, २०२१

६/०२/२०२१

आपल्या इतिहासातील महत्व पूर्ण गोष्टी/सातवी /इतिहास

 

आपल्या इतिहासातील  महत्व पूर्ण गोष्टी/सातवी 


माहीत आहे का तुम्हांला ?

तानाजीचा प्रसिद्ध पोवाडा : रचनाकार  - तुळशीदास शाहीर आहे. या पोवाड्यात सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन आहे. पोवाड्यात तानाजी, शेलारमामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत.

सदर पोवाड्यातील काही भाग येथे दिला आहे.

म्हणाया लागला  ऐंशी वर्षीचा म्हातारा ।।

लगिन राहिले रायबाचे तो मजला सांगावी ।।

माझ्या तानाजी सुभेदारा । जे गेले सिंहगडाला ।।

 त्याचे पाठिरे पाहिले । नाही पुढारे पाहिले ।।

ज्याने आंबारे खाईला । बाठा बुजरा लाविला ।।

त्याचे झाड होउनि आंबे बांधले ।

किल्ला हाती नाही आला ॥

सिंहगड किल्ल्याची वार्ता । काढू नको तानाजी सुभेदारा ।।

जे गेले सिंहगडाला । ते मरूनशानी गेले ।।

तुमचा सपाटा होईल । असे बोलू नको रे मामा ।।

आम्ही सूरमर्द क्षत्री । नाही भिणार मरणाला ।।

माहीत आहे का तुम्हांला ?

१)बाबरानंतर हुमायून (इ.स. १५३० ते इ.स. १५३९ व इ.स. १५५५ ते इ.स.१५५६) गादीवर आला. मुगल सम्राट हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशाहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली.

२)मुगल सम्राट हुमायूननंतर अकबर (इ.स. १५५६ ते इ.स. १६०५) गादीवर आला. अकबर व हेमू यांच्यात इ.स. १५५६ मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होय. अकबर संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अमलाखाली आणण्याची त्याची इच्छा होती.

३) सम्राट अकबरानंतर जहांगीर (इ.स. १६०५ ते इ.स. १६२८) हा सम्राट झाला.

४) मुगल सम्राट जहांगीरानंतर शाहजहान (इ.स. १६२८ ते इ.स. १६५८) सम्राट झाला.

५) मुगल सम्राट शाहजहाननंतर औरंगजेब (इ.स. १६५८ ते इ.स.१७०७) हा दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले.

माहीत आहे का तुम्हांला ?





१)   महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना पुढीलप्रमाणे आहे म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा 'लीळाचरित्र' हा ग्रंथ, आय मराठी कवयित्री महदंबा यांचे 'धवळे', केशोबास यांनी संपादित केलेले 'सूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ', दामोदर पंडितांचे वच्छाहरण’, भास्करभट्ट बोरीकर यांचा 'शिशुपालवध', नरेंद्रांचे 'रुक्मिणीस्वयंवर'.

_____________________________________________

२)     महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत शेख महंमद यांचे 'शेख महंमद अविंध । त्याचे हृदयी गोविंद ।।' हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण होय.

माहीत आहे का तुम्हांला ?


वीर माता जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला 'जिजापूर' असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. 'खेड'ला जोडून असलेले 'शिवापूर' ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती.

 

माहीत आहे का तुम्हांला ?

 

              स्वराज्यात  जहागीर जहागीर म्हणजे एखादया प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क होय . राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळे, त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमेइतके उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे. त्याला 'जहागीर' म्हणत असत .

 

वाचा व  लक्षात ठेवा.

 

बारा मावळ :

 (१) पवणमावळ     () हिरडस मावळ

 () गुंजणमावळ     () पौड खोरे

() मुठे खोरे          () मुसे खोरे

() कानद खोरे       () वेळवंड खोरे

() रोहीड खोरे      (१०) अंदर मावळ

      (११) नाणे मावळ      (१२) कोरबारसे मावळ.

 

शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळ खोरे होय. यांना 'बारा मावळ' असेही म्हणतात.

 

माहीत आहे का तुम्हांला ?



                 युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केवळ सतरा वर्षांचे होते. त्यांनी 'बुधभूषण' ग्रंथात राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केले आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे.'छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतांतून मान्यवर , विद्वान आले होते, त्यांना वजनमाप किंवा मोजमाप  न करता भरभरून धन देऊन तसेच उंची  वस्त्रे व हत्ती, घोडे यांचेही दान करून संतुष्ट करण्यात आले होते  .'अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती निरनिराळ्या दिशांना विस्तारवली होती.

 

माहीत आहे का तुम्हांला ?

 

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत भव्य सिंहासन बनवण्यात | आले. सिंहासनाच्या आठ दिशांना आठ रत्नजडित स्तंभ होते. जवळपास 32 मण सोन्याचे हे सिंहासन बनवण्यात आले होते त्यावर  रत्नांनी जडवलेले होते.'

 


लक्षात ठेवा.

राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द उल्लेखनीय आहेत -

उदा.,  किताब- पदवी, फर्मान राजपत्र,

जामीन -प्रतिभूती, हाली - सांप्रत,

माजी -पूर्व, फिलहाल तत्काळ,

वाहवा -उत्तम,बेवकूफ- मूढ, वकूब - प्रज्ञा,

दस्तपोशी - हस्तस्पर्श,

मुलाखत -दर्शन, कदमपोशी -पादस्पर्श,

झूट - मिथ्या, कौलनामा - अभय,

फतेह - विजय, फिर्याद - अन्यायवार्ता,

शिलेदार - स्वतूरगी.

माहीत आहे का तुम्हांला ?



शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी 'बुधभूषण' या ग्रंथात केलेले वर्णन लक्षणीय आहे. ते पुढीलप्रमाणे :

 'कर्नाटक देशापासून ते बागलाण देशापर्यंत शत्रूंना अभेदय दुर्गच, असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारांच्या रांगांवर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांसभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्यात, ते विजयी आणि सर्व राजांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज राहिले.'