मुक्या कळ्या
देवपूजेसाठी रोज फुले लागत. पहाटे उठून मी फुले तोडावयास जाई. इतर मुलेही येत. जो सर्वात आधी जाई त्याला अधिक फुले मिळत. आधीच्या रविवारी मुलांनी मला एकही फूल मिळू दिले नव्हते. या रविवारी मी खूप पहाटे उठून सर्वात आधी पोहोचलो.गुलबक्षीच्या न उमलेल्या कळ्याही मी घाई-घाईने तोडल्या. घरी येऊन आईपुढे ताम्हण ठेवले. आई म्हणाली, "हे काय? कळ्याच तोडून आणल्यास? अरे, फुलांना झाडांवर नीट फुलू द्यावे!"एवढ्यात सगळी मुले गोळा झाली. बाबी म्हणाली, "तुमच्या शामने सारी फुले तोडून आणली. आम्हाला एकही ठेवले नाही. हा आधाशीपणा चांगला नाही." मी आपली बाजू मांडली, "आई,यांनी मागील रविवारी मला एकही फूल मिळू दिले नाही, म्हणून मी असा वागलो." आईला वाईट वाटले. तिने ताम्हणातील फुले सर्व मुलांना वाटली. शाम पुन्हा असे करणार नाही, असे म्हणाली. मुले गेली. मला स्वतःची लाज वाटली. आई म्हणाली, "शाम, पुन्हा नको हो तोडूस मुक्या कळ्या. त्यांना फुलायची संधी दे. देवाला एकच फूल मिळाले तरी पुरे.'
सानेगुरुजी
साने गुरुजी : हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,समाजसुधारक आणि प्रतिभावान लेखक होते.
जन्मतारीख : २४ डिसेंबर,१९८९
जन्मस्थळ : रत्नागिरी
मृत्युदिनांक : 11
जून,१९५०
मृत्यूस्थल : किंग
एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ सुंदरलाल मेडिकल कॉलेज,मुंबई
चित्रपट : श्यामची
आई
शिक्षण : नू.म.वि.प्रशाला-कनिष्ट
महाविद्यालय ,सर परशुराम महाविद्यालय
