उंदीरमामाचा मास्क
एकदा एक उंदिर फिरत असतांना त्याला काहीतरी दिसले. जवळ जाऊन बघतो तो काय !..तलम मऊ कापडाची चिंधी! इतका सुंदर कपडा त्याने कधी बघितलाच नव्हता. काय करावे या कपड्याचे? उंदराने इकडे तिकडे चोहिकडे बघितले. माणसांनी तोंडाला मास्क बांधलेले त्याला दिसले. ठरले तर! उंदीर सरळ शिंप्याच्या दुकानात गेला. म्हणाला “शिंपीदादा शिंपीदादा, मला या कापडाचा छानसा मास्क शिवून द्या.”
शिंपी म्हणाला 'मला वेळ नाही मला शंभर
मास्क शिवायचे आहेत. तुला कशाला रे मास्क हवा?'
शिंपीदादा, चूपचाप मला मास्क शिवून
द्या नाहीतर मी तुमचे शंभर मास्क कुरतडून टाकीन.'
'दे बाबा तुझी चिंधी दे, तुला मास्क शिवून देतो.
असा तलम कपडा मी कधी बघितला नाही.' शिंपीदादांनी सुंदरसा
मास्क शिवून दिला. मास्क घेऊन उंदीर जरीकाम करणाऱ्या दुकानात गेला. दुकानातील
कारागिराला म्हणाला-'माझ्या या मास्कवर सुंदर
छोटसे जरीकाम करून दे.'
'अरे वा! सुंदर मास्क आहे तुझा!'
“माझा मास्क छान, राजाचा मास्क घाण.”
राजा नोकराला म्हणाला- 'घेऊन ये त्या उंदराचा
मास्क.' राजा मास्क हातात घेऊन पाहू लागला. हा मास्क आमच्या योग्य आहे.
तुला कशाला हवा रे सुंदर मास्क ?
उंदीर ओरडू लागला. “राजा भिकारी SSS माझा मास्क घेतला.”
उंदराचा मास्क राजाला नाही शोभला'... राजाने रागारागाने उंदराचा
मास्क त्याच्या अंगावर भिरकावून दिला. उंदीर पुन्हा ओरडू लागला..
राजा मला भ्यायला.... माझा मास्क दिला.' आणि! उंदीर तेथून पळून
गेला. शाळेच्या पटांगणात मुलं दूर दूर बसले होते. एक मुलगा दूर उभा होता. त्याला
मास्क नव्हता. म्हणून सरांनी त्याला शिक्षा केली होती. उंदीर तेवढ्यात त्या
मुलाजवळ गेला. त्याच्या हातात मास्क ठेवून उंदीर दूर उभा राहिला. मास्क लावून तो
मुलगा शिक्षकांकडे गेला......
'अरे सुरेश कुठून आणला हा सुंदर मास्क?' सरांनी विचारले. 'आता माझा मित्र आला होता.
त्याने दिला'. 'बैस आता. आणि रोज मास्क
लावून यायचं फिजिकल डिस्टन्सिंग पाळायचं. 'हो सर' गणेशने बसता बसता मागे बघितले. उंदीर डोळे भरून सुरेशला पाहत
होता. लगेच उंदीरमामा निघून गेले.

