दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

स्वामी विवेकानंदांची एकाग्रता

 

        


स्वामी विवेकानंदांची एकाग्रता

                         स्वामी विवेकानंद भारतात परतल्यावरची ही गोष्ट आहे. मठात राहत असतांना मठासाठी ब्रिटानिका ज्ञानकोश आणण्यात आले होते. एके दिवशी एक नवीन शिष्य सर्वांसोबत असतांना ते नवीन ज्ञानकोशाचे इतके खंड पाहून बोलला, एका जीवनामध्ये हे एवढे सर्व खंड वाचणं अगदीच अशक्य आहे. त्याला स्वामी विवेकानंदांच्या स्मरणशक्तीची माहिती नव्हती. स्वामीजींनी १०खंड वाचून अकराव्याचे वाचन सुरु केले होते, हे त्याला माहिती नसावे. स्वामीजी म्हणाले, या दहा खंडातील तुझ्या आवडीने कुठलाही विषय निवड आणि मला त्यातील काहीही विचार. शिष्याने विचारले, स्वामीजी, आपण हे सर्व खंड वाचले आहेत का?"

               स्वामीजी म्हणाले,”बाळ ! मग तुला काहीही विचार असे का म्हणालो? विचार! “ जेव्हा विचारण्यात आले तेव्हा स्वामीजींनी केवळ त्या विषयाचे सार सांगितले नाही तर अवघड विषयांतील त्या त्या ठिकाणचे सर्व वाक्य जसेच्या तसे बोलून दाखविले. शिष्य आश्चर्यचकितच झाला तर

स्वामीजी म्हणाले, एकाग्रतेने आपण कुठलीही गोष्ट एकदा वाचली तर आयुष्यभर लक्षात ठेवू शकतो असेच दोन प्रसंग युरोप व अमेरिकेत देखील झाले होते. एकदा जर्मनीत एका प्राध्यापकाने व एकदा शिकागो येथील एका ग्रंथपालाने त्यांच्या वाचनाची व स्मरणशक्तीची अशीच परीक्षा घेतली होती.

 तात्पर्य:- एकाग्रतेने वाचन करावे एकाग्रता ही ज्ञानप्राप्तीची गुरुकिल्ली आहे.