दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

बुधवार, २६ मे, २०२१

9.असा रंगारी श्रावण / 8 वी /मराठी


 9.असा रंगारी श्रावण  / 8 वी /मराठी

     

या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा

 व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .

टेस्ट मनोरंजक असून सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.  

टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.

 

असा रंगारी श्रावण या  कवितेचा भावार्थसमजून घ्या :-

 

श्रावण महिन्यात निसर्गातील विलोभनीय व मनोहर दृश्यांचे वर्णन करताना कवी ऐश्वर्य पाटेकर  म्हणतात की- श्रावण हा रंगांचा जादूगार आहे. तो सृष्टीमध्ये विविध रंग सतत  उधळीत येतो. सृष्टीचा हा चित्रकार आपल्या दिव्य कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो.

 

श्रावण हा सुंदर कलाकार आहे. त्याची किमया काय सांगावी? हा किमयागार अजब आहे. जागोजागी निसर्गात जणू त्याने चित्रांचीच रांग मांडली आहे. सर्वत्र पंगतीत बसलेली चित्रे आहेत.

 

हा श्रावण दरी खोऱ्यात, डोंगरात नाचतो; नदीबरोबर झिम्मा खेळतो; रिमझिम सरींचे मधुर गाणे तो झाडांशी बोलतो.

 

वेलींच्या तो जेव्हा वेण्या घालतो, तेव्हा वेली लाजून चूर होतात. (खूप लाजतात.) वेली मग पानाफुलांचे पातळ नेसून थेंब ठसवून सजतात, नटतात.

 

पोरीबाळींना झोका घेण्यासाठी श्रावण झाडांना झुले टांगतो. त्यांना झोके देतो. झुलवता झुलवता मुलींच्या गाण्यांना नादमय लय देतो.

     लहान मुलांच्या खेळात श्रावण त्यांचा सवंगडी होतो आणि दहीहंडीच्या काल्यात त्यांच्या संगे प्रेमाने संपूर्ण चिंब भिजलेला बाळकृष्णच होतो.