8.सुरांची जादूगिरी / 8 वी /मराठी/टेस्ट-२
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा
व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .
टेस्ट मनोरंजक असून सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.
टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
पाठातील महत्वाचे मुद्दे
आपल्या खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या अधिक जवळ असते. त्यामुळे ते नेहमीच ताजे तवाने व टवटवीत असते. खेड्यातल्या परिसरात नेहमीच उत्साह पूर्ण आवाजात भरून राहिलेले असते.
🎤 रोज नव्या दिवसाची सुरुवात सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने होते. त्यानंतर धान्य दळणाचे आवाज सुरू होतात. त्यांना ओव्यांची साथ मिळते.
🎶थोड्या वेळाने अंधार कमी होतो. अवती भोवतीच्या वस्तू, सर्व दिशा अस्पष्ट, अंधुक दिसू लागतात. प्रकाश अधिकाधिक उजळ होतो, तसतसे आसमंतातील आकार स्पष्ट होत जातात. चिमण्या, कावळे, पोपट यांचे आवाज कानांवर पडू लागतात.
🎵 थोड्या वेळाने या आवाजांत भर पडत जाते. भुकेलेल्या वासरांचे आवाज, बकरीचा आवाज, गोठ्यातल्या जनावरांच्या गळ्यातील घंटांची किणकिण, गाईची धार काढताना होणारा भांड्यात पडणाऱ्या दुधाचा आवाज, विहिरीवरील रहाटाचा आवाज, मोटेचा आवाज हे सर्व आवाज तेथील आसमंतात भरून राहतात.
🎊 आसमंतात जणुकाही आवाजांचे संमेलन भरते. त्यात शाळेतल्या प्रार्थनेचा आवाज असतो, जनावरांचे हंबरणे असते, लहान मुलांचे आवाज तर आभाळभर पसरतात. घरातल्या भांड्यांचे आवाज, स्वयंपाक करतानाचे विविध आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज, झऱ्यांचे आवाज, ओढ्यांची खळखळ, पानांची सळसळ, कुत्र्यांचे आवाज, कोंबड्यांचे आवाज, देवळातल्या घंटांचे आवाज, जनावरांच्या खुरांचे आवाज, बायकांच्या कांकणांची किणकिण अशा शेकडो आवाजांचे रंगतदार संमेल असते ते.या पाठावरील टेस्ट सोडवा ...............