10.अण्णाभाऊंची भेट / 8 वी /मराठी
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा
व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .
टेस्ट मनोरंजक असून सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.
टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
७.अण्णाभाऊंची भेट या पाठाचा आशय / आठवी मराठी
मराठीतील प्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे हे मुंबई शहरात , घाटकोपर मधील चिरागनगर या झोपडपट्टीत राहत असत .त्याच
काळातील शाहीर विठ्ठल उमप यांचे कार्यक्रम
त्या काळात आकाशवाणीवर गाजत होते. अण्णाभाऊंना शाहीर उमपांना भेटण्याची खूप इच्छा
होती. उमपांना अण्णाभाऊंना भेटण्याची ओढ लागली होती. त्याचवेळी अण्णाभाऊंनी भिकाजी
तुपसौंदर यांच्यामार्फत चिरागनगरात येऊन भेटा असा निरोप विठ्ठल उमपांना पाठवला.
विठ्ठल उमप भेटण्यासाठी चिरागनगरात
गेले. तेथे जाण्यासाठीची वाट खाचखळग्यांची, ओबडधोबड
होती. सर्वत्र चिखल, दलदल व पाण्याची डबकी पसरलेली होती. चौकशी करीत
करीत उमप अण्णाभाऊंच्या झोपडीत पोहोचले. काळ्यासावळ्या वर्णाचे अण्णाभाऊ
घामेजलेल्या अंगाने बाहेर आहे. दोघेही झोपडीत गेले. मग बाहेरच असलेल्या एका
झोपडीतल्या चहावाल्याच्या हॉटेलात गेले. दोघांनाही एकमेकाला भेटल्याचा खूप आनंद झाला.
त्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल उमप अण्णाभाऊंच्या भेटीला
गेले. या वेळी त्यांना अण्णाभाऊंच्या झोपडीचे पूर्ण दर्शन घडले. झोपडीतच पाणी
साचलेले डबके होते. मोडके टेबल, मोडकी
खुर्ची हे फर्निचर त्या झोपडीत होते . घरात एकच तांब्या, एकच अॅल्युमिनियमचे ताट, एकच डेचकी एवढीच भांडीकुंडी होती. अण्णाभाऊंचा
पोशाख म्हणजे एकच सदरा व एकच धोतर .
अण्णा हे त्याकाळातील प्रसिद्ध लेखक होते. एक प्रकाशक आला आणि केवळ एक ट्रॅन्झिस्टर देऊन त्यांचे लेखन घेऊन गेला. त्यांच्या कथा-कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या होत्या. त्यांची अमाप रॉयल्टी मॉस्कोतल्या बँकेत पडून होती. अण्णा ती घेतच नव्हते. पैसा आला की आपण वास्तवापासून दूर जाऊ, सकस साहित्य निर्माण करता येणार नाही, गरिबांची दुःखे आपल्याला वेशीवर टांगता येणार नाहीत, अशी अण्णाभाऊंना मनातून भीती वाटत होती.अशी ही भेट उमपांना कायम लक्ष्यात राहिली .मोठ्या माणसांचे मोठेपण हे त्यांच्या राहणीमानात नसून त्यांच्या मोठ्या विचारात असते .