6.शिवपूर्वकालीन महाराष्ट्र /7 वी/ इतिहास
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
माहीत आहे का तुम्हांला ?
वीर माता जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार
पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली.
तिला 'जिजापूर' असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे
वसवलेल्या नव्या पेठा आहेत. 'खेड'ला जोडून असलेले 'शिवापूर' ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती.
आपल्या इतिहासातील महत्वपूर्ण
गोष्टी
माहीत आहे का तुम्हांला ?
स्वराज्यात जहागीर जहागीर म्हणजे एखादया प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क होय . राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळे, त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता
वेतनाच्या रकमेइतके उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे.
त्याला 'जहागीर' म्हणत
असत .
वाचा
व लक्षात ठेवा.
बारा मावळ :
(१)
पवणमावळ (२) हिरडस मावळ
(३) गुंजणमावळ (४) पौड खोरे
(५) मुठे खोरे (६) मुसे खोरे
(७) कानद खोरे (८) वेळवंड खोरे
(९) रोहीड खोरे (१०) अंदर मावळ
(११) नाणे मावळ (१२) कोरबारसे मावळ.
शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या
कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळ खोरे होय. यांना 'बारा मावळ' असेही म्हणतात.
