इतिहासाची साधने /7 वी/ इतिहास
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
आपल्या इतिहासातील गमतीशीर महत्व पूर्ण गोष्टी
माहीत आहे का तुम्हांला ?
तानाजीचा प्रसिद्ध पोवाडा : रचनाकार
- तुळशीदास शाहीर आहे. या पोवाड्यात
सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन आहे. पोवाड्यात तानाजी, शेलारमामा, शिवाजी महाराज, वीरमाता
जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत.
सदर पोवाड्यातील काही भाग येथे दिला
आहे.
म्हणाया लागला ऐंशी वर्षीचा म्हातारा ।।
“लगिन राहिले रायबाचे तो मजला
सांगावी ।।
माझ्या तानाजी सुभेदारा । जे गेले
सिंहगडाला ।।
त्याचे पाठिरे पाहिले । नाही पुढारे पाहिले ।।
ज्याने आंबारे खाईला । बाठा बुजरा
लाविला ।।
त्याचे झाड होउनि आंबे बांधले ।
किल्ला हाती नाही आला ॥
सिंहगड किल्ल्याची वार्ता । काढू
नको तानाजी सुभेदारा ।।
जे गेले सिंहगडाला । ते मरूनशानी
गेले ।।
तुमचा सपाटा होईल । असे बोलू नको रे
मामा ।।
आम्ही
सूरमर्द क्षत्री । नाही भिणार मरणाला ।।”