७.Dhulperni/धूळपेरणी /इयत्ता चौथी /विषय मराठीशेतकऱ्यांच्या मनातील भाव व्यक्त करताना कवी म्हणतात ,पाऊस पडण्यापूर्वी पेरणी केली आहे तिच्यातून पिकांची भरभराट होऊ दे. पिकांच्या प्रतीक्षेत मातीचा प्राण झुरत चालला आहे. माती व्याकुळतेने पावसाची वाट पाहत आहे.शेतजमिनीला हिरव्या नव्या पिकांची ओढ लागली आहे. पिक नसलेले त्रासदायक दिवस कधी शेतकऱ्यांच्या वाट्याला येऊ नये.
त्याचे डोळे चातक बनुन काळे ढगासाठी व्याकुळ झाले आहेत. तो चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. पावसाळी नक्षत्र गेलेले पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे. लांबवर काळ्या ढगांनी दाटलेल्या आकाशाकडे आशेने पाहत आहे. काळ्या पावसाळी ढगांच्या खुणा डोळ्यांना दिसतात मातीचा कण अन कण तरारला आहे. जणू कणांना नवीन पालवी फुटली आहे.काळे ढग पाहून माती आनंदित झाली आहे.
सरावासाठी टेस्ट सोडवा

