४ . या भारतात ... ( कविता ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
कवितेचा अर्थ
या भारतातील लोकांमध्ये भावंडा प्रमाणे प्रेम व मित्र भाव सतत राहू दे .देवा मला आशीर्वाद दे सर्व पंथामध्ये व संप्रदायामध्ये एकता दिसावी . त्यांच्या विचारात अजिबात भेदभाव नसू दे
.सर्व हिंदू ,ख्रिश्चन ,मुस्लिम, शीख बांधव सर्व त्यामधील गरीब आणि श्रीमंत एकजुटीने आनंदात राहू दे .या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद वसु दे .असा मला वर दे. सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे.
सर्व प्रार्थना स्थळावर एकत्र प्रार्थना होऊ दे . या देशातील कष्टाळू पराक्रमी तरुण शीलवान होऊ दे .असा मला आशीर्वाद लाभू दे .
परस्परातील जातीभेद विसरून आमच्यात एकता होऊदे .या जगातून अस्पृश्यता मुळासकट नाहीशी होऊ दे .जे दुर्जन व निंदक आहेत त्यांच्या मनातही सत्य भावना असू दे .असा मला वर दे .
प्रत्येक घरात स्वर्गाप्रमाणे सुख व सौंदर्य असावे. बाहेरील परकी भीती आणि संकट नष्ट व्हावे अशी विनवणी तुकडोजी महाराज देवास करतो .
मला नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असुदे असा मला आशीर्वाद असे तुकडोजी महाराज वरदान मांगत आहेत .
खालील टेस्ट सोडवा .
