अकबर बिरबल व पाच मूर्ख माणूस
अकबर
बिरबल सभेत बसून गोष्टी करत होते. तेव्हाचं अकबर म्हणाला मला या राज्यातील 5 मूर्ख
माणूस शोधून दाखवं. राजाचा आदेश ऐकून
बिरबलाने शोध सुरू केला. एका महिन्यानंतर बिरबल दोन लोकांना घेऊन परतला तर अकबर
म्हणाला, मी तर तुला 5 मूर्ख माणूस
आण्यासाठी सांगितले होते आणि तू फक्त दोनचं घेऊन आला.
पहिला मूर्ख माणूस : यावर बिरबल म्हणाला, सम्राट! हा पहिला मूर्ख माणूस आहे. मी याला घोड्यावर बसून जड गवताच ओझं डोक्यावर घेऊन जातांना
पाहिले. याच कारण विचारल्यावर तो माणूस म्हणाला की घोड्याला जास्त ओझं नको म्हणून मी ते डोक्यावर घेतलं
आहे. या प्रकारे हा पहिला मूर्ख माणूस
आहे.
दुसरा मूर्ख माणूस : हा दुसरा मूर्ख माणूस जो आपल्या गाईला गवत खाऊ घालण्यासाठी गच्चीवर घेऊन जातो. कारण विचारल्यावर म्हणाला
की गच्चीवर गवत उगते म्हणून मी गाईला वरती नेतो. हा माणूस गच्चीवरील गवत कापून
फेकू शकत नाही आणि गाईला वर घेऊन जातो म्हणजेच की हा दुसरा मूर्ख माणूस आहेत.
तिसरा मूर्ख माणूस : सम्राट! आपल्या राज्यात इतके काम आहे, . असे असूनही मी या मूर्खांना शोधण्यासाठी
मी एक महिना वाया घालवला म्हणून तिसरा
मूर्ख माणूस मीच आहे.
चौथा मूर्ख माणूस : सम्राट! पूर्ण राज्याची जबाबदारी आपल्यावर
आहे. सुपीक डोके असणाऱ्याकडून आपण कामाची अपेक्षा ठेवू शकतो आणि मूर्ख माणूस लोकं आमच्यासाठी मुळीच कामाचे नाही तरीही आपण
मूर्खांच्या शोधात आहे ,या अर्थी आपण चौथे मूर्ख माणूस आहात.
पाचवा मूर्ख माणूस : सम्राट! आता मी सांगत आहे . आपआपल्या नोकरी-धंद्यातील
इतके महत्त्वाचे काम सोडून जो हा किस्सा वाचत आहे आणि पाचवा मूर्ख माणूस कोण हे माहीत करण्यासाठी अजून ही वाचतोय तोच या
गोष्टीतील पाचवा मूर्ख माणूस आहेत.
