दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

गुरुवार, ३ जून, २०२१

३.पडघमवरती टिपरी पडली / तिसरी /मराठी

 ३.पडघमवरती टिपरी पडली / तिसरी /मराठी 

या पाठाचे काळजीपूर्वक वाचन करा .पाठचा अभ्यास करा व या पाठावर आधारित खालील ऑनलाईन चाचणी सोडवा .चांगले गुण मिळेपर्यंत प्रयत्न करा .टेस्ट मनोरंजक असून बनवलेली असून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.टेस्ट २०गुणांची असून त्यामध्ये १० प्रश्न आहेत .सर्वांना टेस्ट सोडवण्यासाठी शुभेच्छा !




 कविता ऐका. म्हणा. वाचा.

 

पडघमवरती टिपरी पडली

 तडम् तड़तड् तडम्,

कौलारावर थेंब टपोरे

तडम् तड्तड् तडम्

म्हातारी हरभरे भरडते

ढगात गड्गड् गडम्

थेंबासोबत वीज कोसळे

 कडम् कड्कड् कडम् ।।

थेंबाभवती जलात उठती

तरंग थरथर तरंग,

नाचू लागले अंगण सारे

आनंदाचे तरंग ।।

पाऊसधारा... मधेच वारा

 पान पान सळसळून..

धरतीच्या रंध्रा रंध्रातुन

 संगीत आले जुळून

कवी:- राजा ढाले