दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

बुधवार, २ जून, २०२१

आठवी मराठी पाठांचा आशय व कवितेचा भावार्थ

 

आठवी मराठी पाठांचा आशय  व कवितेचा भावार्थ 

पाठ/कविता  १ ते ५

१.भरत देश महान / ८ वी मराठी या कवितेचा भावार्थ

या कवितेचा अर्थ समजून घेऊ व मग टेस्ट सोडूया

आपला देश वासीयांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात.भारतवासी जनहो, चला आपण आता 'भारत आपला देश  महान आहे, हे गीत आपण एकमुखाने गाऊया. आपल्या भारताची थोरवी एकजुटीने,एकमुखाने  गाऊया. ।।धृ.।।

माझ्या भारतभूमीच्या मस्तका वर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे डोलत आहेत. (जणू हिमशिखरांचा मुकुट भारतभूम मस्तकावर धारण केला आहे.) गंगा, यमुना व गोमती या नदया आपल्या पवित्र पाण्याने जणू भारतभूमिला अंघोळ घालत आहेत. ॥१॥

पुढे कवी म्हणतात की भारत भूमीचा हा नवीन इतिहास महान  बलिदानाचा, शौर्याचा व पराक्रमाचा आहे. राष्ट्राभिमान जागृत करणारा व समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे. ॥२॥

आपल्या  या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले, स्वातंत्र्य संग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण जे लढले व पवित्र झाले; त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगले आहे. त्याची ग्वाही आपल्याला  उंच फडकत असलेला हा  आपला  राष्ट्रीय ध्वज देत आहे. आपले हे  निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहो. ||||

या कवितेचे कवी: माधव विचारे

__________________________________________

२.माझ्या देशावर माझे प्रेम आहे /८ वी मराठी

या पाठातील महत्त्वाचे मुद्दे वाचा व या पाठवारील टेस्ट सोडवा  :-

(१) लेखक एकदा शाळेत गेले होते. तेथे, 'भारत माझा आपला देश  आहे', ही प्रतिज्ञा मुले मोठ्याने म्हणत होती. लेखकांना खूप आनंद झाला.

(२) आपण आपल्या देशावर प्रेम करतो, याचा अर्थ काय ? ज्याप्रमाणे  आई आपल्या  मुलावर प्रेम करते म्हणजे ती त्याचे पालनपोषण करते आणि त्याला वाढवते. त्याचप्रमाणे  देशाचे पालन पोषण करणे आणि त्याचा गौरव वाढविणे म्हणजे देशावर प्रेम करणे होय.

 

(३) आपला देश  = देशाची भूमी व देशातील लोक. देशातील लोक म्हणजेच आपले  आपला देश बांधव. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमी वर प्रेम करणे आणि आपला देश  बांधवांवर प्रेम करणे होय.

(४) आता  आपल्याला थोर क्रांतिकारक  भगतसिंग, राजगुरु यांच्या सारख्या क्रांतिवीरांप्रमाणे देशावर प्राणांचे बलिदान देणारे   प्रेम करण्याची गरज नाही. त्या वेळी आपला  आपला देश  गुलाम होता. राज्यकर्ते परकीय होते. आता आपण स्वतंत्र आहोत. आपणच जनता आणि आपणच राज्यकर्ते आहोत. आपला देश  संकटात असला तरच देशावर प्रेम करायचे असते, असे नाही.

(५) आपला देश बांधवांवर प्रेम करायचे म्हणजे त्यांच्या आनंदात आपण आनंदी व्हायचे आणि त्यांच्या दुःखात त्यांना मदत करायला धावायचे.

(६) शांततेच्या काळात आपल्या छोट्या छोट्या कृतींद्वारे आपण देशावर प्रेम करू शकतो. ती कृती करताना तिचा आपला देश बांधवांवर कोणता परिणाम होईल, याचा विचार केला पाहिजे. आपला देश बांधवांचे भले होईल अशीच कृती आपण केली पाहिजे.

(७) आपल्या कृतीत आपल्या  देश  बांधवांविषयी आत्मीयता असेल तर आपली कृती आपला देश प्रेमाची ठरते व आपल्या मनात स्वतःच्या  विषयी जशी आत्मीयता असते, प्रेम असते, त्याच प्रमाणे आत्मीयता, प्रेम आपला देश बांधवांविषयी असले पाहिजे. आपला देश बांधवांना न्याय, स्वातंत्र्य, समता व आपुलकी देणे म्हणजे त्यांच्याविषयी आत्मीयता असणे होय. हेच आपले  देश प्रेम आहे.

जय हिंद !

______________________________________________========================================

३.लाखाच्या.....कोटीच्या गप्पा /८ वी मराठी

आपण या कथेचा आशय समजून घेऊया

इगतपुरी स्टेशनवर इंजिनात बिघाड झाल्यामुळे गाडी तीन तास खोळंबली. लोक कंटाळले. दोन प्रवासी मात्र आनंदाने गप्पा मारीत बसले. परंतु तासाभराने तेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यावर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या.ते आता  मुक्तपणे आणि मोठ्याने बोलत होते. त्यांच्या बोलण्याचे सार असे होते की, ते दोघे काका-पुतण्या होते. त्यातील  तरुण प्रवासी पुतण्या होता  आणि म्हातारा प्रवासी काका होते. काका श्रीमंत होते. आपला पुतण्या खूप शिकावा, त्याने बॅरिस्टर व्हावे, असे काकांना  कळकळीने वाटत होते. त्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा करायला ते तयार होते.त्यासाठी काका  विमानाचा खर्च करणार होते. लंडमध्ये राहण्यासाठी भाड्याने बंगला घेऊन दयायची

 

त्यांची तयारी होती.काका  दरवर्षी १५ लाख रुपये याप्रमाणे तीन वर्षासाठी ४५ लाख रुपये पुतण्याला  ते देणार होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या बॅगेत कोट्यवधी रुपये होते. त्यांतील लागतील तेवढे पैसे ते पुतण्यासाठी खर्च करणार होते. पुतण्याची संपूर्ण युरोप पाहण्याची व फिरण्याची  इच्छा पूर्ण करण्याची त्यांची तयारी होती. ऐकणाऱ्या कोणालाही काका खूपच श्रीमंत आहेत आणि ते लाखो कोटी रुपये सोबत घेऊन हिंडतात, असे वाटले असते. तसेच झाले आणि एका चोरट्याने त्यांच्या बॅगा पळवल्या. बॅगा पळवल्याची घटना उघड झाल्यावर चर्चा होते. चर्चेतून वेगळेच सत्य बाहेर येते. ते दोघे म्हणजे शरद तळवलकर आणि राजा गोसावी हे अभिनेते होते. स्टेशनवर मोठमोठ्याने चाललेल्या त्यांच्या गप्पा म्हणजे खरेतर त्यांच्या नाटकातले संवाद होते. ते तिथे बसल्या बसल्या नाटकाचा सराव  करीत होते. त्यातून हा गमतीदार प्रसंग घडला.........

========================================

४.नव्या युगाचे गाणे//८ वी मराठी /या  कवितेचा भावार्थ समजून घ्या :-

                ज्याप्रमाणे अणुरेणूच्या अतिसूक्ष्म कणाकणातून शब्द प्रकटत आहे - 'जन हो, चला.. चला पुढे चला.' विज्ञानाचे तेज आल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे. विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे. त्याची तेजस्वी प्रकाश  सर्वत्र दिसते आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आता  आम्हांला आली आहे.आता मनामनात खोलवर असलेली अस्वस्थतेची अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे; कारण कि  उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडला आहे.

                 नवचैतन्य मनामनात स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. निराशेची होळी करून नवीन विचारांचे तेज अवतरले आहे. माणुसकीच्या मार्गावर द्वेषाच्या, नश्वरतेच्या थोड्याशा ज्वाला जरी शिल्लक राहिल्या असल्या तरी चिरंजिवीतेची, अमरत्वाची फुले वेचून ती एकत्र गुंफून आपण एकजुटीची  माळ तयार करूया..

                                आता उदासपणा,खिन्नता  नको, गरिबी दारिद्र्य नको. या खिन्नतेच्या अंधाराला भेदणारा नवीन सूर्य उगवतो आहे. उत्कर्षाचा, प्रगतीचा प्रकाश दाहीदिशांत झळकतो आहे. दैन्याच्या अंधाराला चिरणारा आपला लढा मनामनात फुलतो आहे.

                    आता  रक्तारक्तात नवीन जोम, नवीन उत्साह उसळी घेत  आहे. नवीन आशा मनामनात रुजल्या आहेत. या उज्ज्वल विज्ञान युगातील अणुरेणूतून नवीन  शब्द प्रकटत आहे. लोकांनो, पुढे चला व  प्रगती करा.असे कवी आपल्याला म्हणत आहे.

___________________________________________

५.सुरांची जादुगिरी//८ वी मराठी /या पाठातील महत्त्वाचे मुद्दे अभ्यासू

                १. आपल्या  खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या अधिक जवळ असते. त्यामुळे ते नेहमीच ताजे तवाने  व टवटवीत असते. खेड्यातल्या परिसरात नेहमीच उत्साह पूर्ण  आवाजात  भरून राहिलेले असते.

         २.रोज नव्या  दिवसाची सुरुवात सकाळी  कोंबड्याच्या आरवण्याने होते. त्यानंतर धान्य दळणाचे आवाज सुरू होतात. त्यांना ओव्यांची साथ मिळते.

           ३. थोड्या वेळाने अंधार कमी होतो. अवती भोवतीच्या वस्तू, सर्व दिशा अस्पष्ट, अंधुक दिसू लागतात. प्रकाश अधिकाधिक उजळ होतो, तसतसे आसमंतातील आकार स्पष्ट होत जातात. चिमण्या, कावळे, पोपट यांचे आवाज कानांवर पडू लागतात.

            ४. थोड्या वेळाने या  आवाजांत भर पडत जाते. भुकेलेल्या वासरांचे आवाज, बकरीचा आवाज, गोठ्यातल्या जनावरांच्या गळ्यातील घंटांची किणकिण, गाईची धार काढताना होणारा भांड्यात पडणाऱ्या दुधाचा आवाज, विहिरीवरील रहाटाचा आवाज, मोटेचा आवाज हे सर्व आवाज तेथील  आसमंतात भरून राहतात.

          ५. आसमंतात जणुकाही आवाजांचे संमेलन भरते. त्यात शाळेतल्या प्रार्थनेचा आवाज असतो, जनावरांचे हंबरणे असते, लहान मुलांचे आवाज तर आभाळभर पसरतात. घरातल्या भांड्यांचे आवाज, स्वयंपाक करतानाचे विविध आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज, झऱ्यांचे आवाज, ओढ्यांची खळखळ, पानांची सळसळ, कुत्र्यांचे आवाज, कोंबड्यांचे आवाज, देवळातल्या घंटांचे आवाज, जनावरांच्या खुरांचे आवाज, बायकांच्या कांकणांची किणकिण अशा शेकडो आवाजांचे रंगतदार संमेल असते ते.या पाठावरील टेस्ट सोडवा ...............