मुघलांशी संघर्ष / 7 वी / इतिहास
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
आपल्या इतिहासातील
महत्वपूर्ण गोष्टी
माहीत आहे का तुम्हांला ?
युवराज संभाजीराजे शिवाजी
महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केवळ सतरा वर्षांचे होते. त्यांनी 'बुधभूषण' ग्रंथात
राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केले आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर
आधारित आहे.'छत्रपती
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतांतून
मान्यवर , विद्वान आले होते, त्यांना वजनमाप
किंवा मोजमाप न करता भरभरून धन देऊन तसेच
उंची वस्त्रे व हत्ती, घोडे यांचेही दान
करून संतुष्ट करण्यात आले होते .'अशा प्रकारे
छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती निरनिराळ्या दिशांना विस्तारवली होती.
माहीत आहे का तुम्हांला ?
शिवाजी महाराजांच्या
राज्याभिषेकासाठी अत्यंत भव्य सिंहासन बनवण्यात | आले. सिंहासनाच्या आठ दिशांना आठ
रत्नजडित स्तंभ होते. जवळपास 32 मण सोन्याचे हे सिंहासन बनवण्यात आले होते
त्यावर रत्नांनी जडवलेले होते.'
लक्षात ठेवा.
राज्यव्यवहार कोशातील काही
प्रतिशब्द उल्लेखनीय आहेत -
उदा., किताब-
पदवी, फर्मान राजपत्र,
जामीन -प्रतिभूती, हाली - सांप्रत,
माजी -पूर्व, फिलहाल तत्काळ,
वाहवा -उत्तम,बेवकूफ- मूढ, वकूब - प्रज्ञा,
दस्तपोशी - हस्तस्पर्श,
मुलाखत -दर्शन, कदमपोशी
-पादस्पर्श,
झूट - मिथ्या, कौलनामा - अभय,
फतेह - विजय, फिर्याद -
अन्यायवार्ता,
शिलेदार - स्वतूरगी.
