6.नव्या युगाचे गाणे / 8 वी /मराठी
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा
व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .
टेस्ट मनोरंजक असून सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.
टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
नव्या युगाचे गाणे या कवितेचा भावार्थ समजून घ्या :-
ज्याप्रमाणे अणुरेणूच्या
अतिसूक्ष्म कणाकणातून शब्द प्रकटत आहे - 'जन
हो, चला.. चला पुढे चला.' विज्ञानाचे
तेज आल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे. विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे. त्याची
तेजस्वी प्रकाश सर्वत्र दिसते आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आता
आम्हांला आली आहे.आता मनामनात खोलवर
असलेली अस्वस्थतेची अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे; कारण कि उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडला आहे.
नवचैतन्य
मनामनात स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. निराशेची होळी करून
नवीन विचारांचे तेज अवतरले आहे. माणुसकीच्या मार्गावर द्वेषाच्या, नश्वरतेच्या थोड्याशा ज्वाला जरी शिल्लक
राहिल्या असल्या तरी चिरंजिवीतेची, अमरत्वाची
फुले वेचून ती एकत्र गुंफून आपण एकजुटीची माळ तयार करूया..
आता उदासपणा,खिन्नता नको, गरिबी दारिद्र्य नको. या खिन्नतेच्या अंधाराला
भेदणारा नवीन सूर्य उगवतो आहे. उत्कर्षाचा, प्रगतीचा
प्रकाश दाहीदिशांत झळकतो आहे. दैन्याच्या अंधाराला चिरणारा आपला लढा मनामनात फुलतो
आहे.
आता रक्तारक्तात नवीन जोम, नवीन उत्साह उसळी घेत आहे. नवीन आशा मनामनात रुजल्या आहेत. या उज्ज्वल विज्ञान युगातील अणुरेणूतून नवीन शब्द प्रकटत आहे. लोकांनो, पुढे चला व प्रगती करा.असे कवी आपल्याला म्हणत आहे.