5.लाखाच्या ...कोटीच्या गप्पा / ८ वी /मराठी /टेस्ट-2
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा
व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .
टेस्ट मनोरंजक असून सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.
टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
आशय
आपण
या कथेचा आशय समजून घेऊया
इगतपुरी
स्टेशनवर इंजिनात बिघाड झाल्यामुळे गाडी तीन तास खोळंबली. लोक कंटाळले. दोन
प्रवासी मात्र आनंदाने गप्पा मारीत बसले. परंतु तासाभराने तेही कंटाळले. त्यांनी चहा
मागवला. चहा घेतल्यावर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या.ते आता मुक्तपणे आणि मोठ्याने बोलत होते. त्यांच्या
बोलण्याचे सार असे होते की, ते दोघे काका-पुतण्या होते. त्यातील तरुण प्रवासी पुतण्या होता आणि म्हातारा प्रवासी काका होते. काका श्रीमंत
होते. आपला पुतण्या खूप शिकावा, त्याने
बॅरिस्टर व्हावे, असे काकांना कळकळीने वाटत होते. त्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा
करायला ते तयार होते.त्यासाठी काका विमानाचा खर्च करणार होते. लंडमध्ये राहण्यासाठी
भाड्याने बंगला घेऊन दयायची
त्यांची
तयारी होती.काका दरवर्षी १५ लाख रुपये
याप्रमाणे तीन वर्षासाठी ४५ लाख रुपये पुतण्याला ते देणार होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या बॅगेत
कोट्यवधी रुपये होते. त्यांतील लागतील तेवढे पैसे ते पुतण्यासाठी खर्च करणार होते.
पुतण्याची संपूर्ण युरोप पाहण्याची व फिरण्याची इच्छा पूर्ण करण्याची त्यांची तयारी होती.
ऐकणाऱ्या कोणालाही काका खूपच श्रीमंत आहेत आणि ते लाखो कोटी रुपये सोबत घेऊन
हिंडतात, असे वाटले असते. तसेच झाले आणि एका चोरट्याने
त्यांच्या बॅगा पळवल्या. बॅगा पळवल्याची घटना उघड झाल्यावर चर्चा होते. चर्चेतून
वेगळेच सत्य बाहेर येते. ते दोघे म्हणजे शरद तळवलकर आणि राजा गोसावी हे अभिनेते
होते. स्टेशनवर मोठमोठ्याने चाललेल्या त्यांच्या गप्पा म्हणजे खरेतर त्यांच्या
नाटकातले संवाद होते. ते तिथे बसल्या बसल्या नाटकाचा सराव करीत होते. त्यातून हा गमतीदार प्रसंग घडला.........