5.हवेचा दाब / 7 वी /भूगोल
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
वाचा व लक्ष्यात ठेवा :-
४ हवेचा दाब
१. तापमान व हवेचा दाब :
(१) तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा
संबंध आहे. जेथे तापमान जास्त असते, तेथे हवेचा दाब कमी असतो.
(२) जास्त
तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण
पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे संबंधित
प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो.
२. तापमानपट्टे व
हवादाबपट्टे
: (१) तापमानपट्टे आणि हवादाबपट्टे
यांचा परस्परांशी संबंध असतो. (२) तापमानपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त
असतो, तर
हवादाबपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार मर्यादित (कमी) असतो.
(३) तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या
दाबावर होतो. त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान
क्षितिजसमांतर दिशेत हवेच्या कमी दाबाचे व हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण
होतात.
३. भूपृष्ठावरील हवादाबपट्टे
:
सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी
उष्णता असमान आहे. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे
तापमानाचे वितरण असमान असते. त्यामुळे पृथ्वीवर प्रथम तापमानपट्टे (कटिबंध)
निर्माण होतात. तापमानपट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हवादाबपट्ट्यांची निर्मिती होते.
(१) विषुववृत्तीय
कमी दाबाचा पट्टा : ०° ते ५° उत्तर व दक्षिण
अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
(२) मध्य
अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे : उत्तर गोलार्धात आणि दक्षिण
गोलार्धात २५० ते ३५० अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण
होतात. ही हवा कोरडी असते. त्यामुळे पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.
(३) उपधुवीय
कमी दाबाचे पट्टे : उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात ५५% ते ६५° अक्षवृत्तांच्या
दरम्यान उपधृवीय कमी दाबाचे पट्टे तयार होतात.
(४) ध्रुवीय
जास्त दाबाचे पट्टे : उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात ८०% ते ९०%
या अक्षवृत्तांच्या दरम्यान ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे दिसून येतात.
______________________________________________
४. हवादाबपट्ट्यांचे
आंदोलन ::
(१) सूर्याच्या उत्तरायण आणि
दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणान्या सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता विषुववृत्तापासून
उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते.
(२) परिणामी तापमानपट्ट्यांवर
अवलंबून असलेल्या हवादाबपट्ट्यांच्या स्थानात बदल होतो. हा बदल सर्वसाधारणपणे
उत्तरायणात ५० से ७° उत्तरेकडे
व दक्षिणायनात ५° ते
७° दक्षिणेकडे असा
असतो.
________________________________________
५. तापमानपट्टे व
हवादाबपट्टे यांतील महत्त्वाचा फरक :
(१) तापमानपट्टे व हवादाबपट्टे
यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे तापमानपट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही
ध्रुवांकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात.
(२) हवादाबपट्टे सलग नसून ते कमी व जास्त
हवादाबाची क्षेत्रे यांनुसार विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना
वेगवेगळ्या भागांत आढळतात.
६. हवेच्या दाबाचे परिणाम
(१) वान्यांची निर्मिती
(२) वादळांची निर्मिती
(३) उंची मोजण्यासाठी उपयुक्त
(४) आरोह पर्जन्याची निर्मिती
(५) सजीवांच्या श्वसनक्रियेवर
परिणाम,
