दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

रविवार, २३ मे, २०२१

3.सूर्य ,चंद्र व पृथ्वी / 7 वी /भूगोल/




 3.सूर्य ,चंद्र व पृथ्वी / 7 वी /भूगोल/टेस्ट 2

            या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून  आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.  टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.



वाचा व लक्ष्यात ठेवा :-

ग्रहणे :

(१)     पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा :

आपल्या पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आहे  व चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे या नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५०अंशाचा  कोन करते.त्याचा परिणाम चंद्र प्रत्येक परिभ्रमणा दरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदत असतो .

 (२) अमावास्या व सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांना साधणारी रेषा : प्रत्येक अमावास्येला सूर्य, पृथ्वी व चंद्र या तीन खगोलांचा क्रम सूर्य,चंद्र ,पृथ्वी असा असतो , तरी प्रत्येक अमावास्येला या तीन खगोलांना सांधणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोन असत नाही.

(३) पौर्णिमा व सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांना सांधणारी रेषा : प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी व चंद्र या तीन खगोलांचा क्रम सूर्य पृथ्वीचंद्र असा असला, तरी प्रत्येक पौर्णिमेला या तीन खगोलांना सांधणाऱ्या रेषेत १८० अंशांचा कोन असत नाही.

 

(४) प्रत्येक अमावास्येस व पौर्णिमेस ग्रहणे न होण्याचे कारण : प्रत्येक अमावास्येला किंवा पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक अमावास्येस व पौर्णिमेस ग्रहणें होत नाहीत.

(५) ग्रहणे व सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची स्थिती : काही अमावास्यांना व पौर्णिमांना सूर्य, पृथ्वी व चंद्रका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. ग्रहणे सूर्याच्या व चंद्राच्या संदर्भात घडतात.

 

सूर्यग्रहणे :

(१) सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये  चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. व या स्थितीत सूर्य,चंद्र व  पृथ्वी एका सरळ रेषेत व एका सम पातळीत येतात ,त्यावेळी सूर्यग्रहण होते .लक्ष्यात ठेवा  त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, तेथून सूर्यग्रहण आपल्याला चांगले  अनुभवता येत असते.

(२) चंद्राची सावली दोन प्रकारे पडते. मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते.

(३) पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची दाट सावली पडते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे 'खग्रास सूर्यग्रहण' होय. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते.

(४) पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची विरळ सावली पडते, तेथून सूर्य अंशतः झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे 'खंडग्रास सूर्यग्रहण' होय.

(५) काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. अशा स्थितीत चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही; ती अवकाशातच संपते. त्यामुळे अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची केवळ प्रकाशमान कडा एखादया हातातील  बांगडीप्रमाणे दिसते.याला  कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात . कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते.

 

चंद्रग्रहणे :

(१) चंद्र व सूर्य यांच्यादरम्यान पृथ्वी एकाच पातळीत आल्यास चंद्रग्रहण घडते.

(२) जेव्हा  चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गातून जात असताना  जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो, तेव्हा चंद्रग्रहण घडून येते.

(३) पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. या दाट सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला गेल्यास 'खग्रास चंद्रग्रहण' होते.

(४) पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो व त्या  दाट सावलीमुळे चंद्र अंशतः झाकला गेल्यास 'खंडग्रास चंद्रग्रहण' हे  होते.