संविधानाची उद्देशिका / 7 वी / नागरिकशास्त्र
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
आपल्या संविधानाविषयी
माहीत आहे का तुम्हांला ?
अमेरिका, इंग्लंड या देशांचा राज्यकारभार त्यांच्या
संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानांमध्ये थोडे फरक आहे.जसे
उदा. अमेरिकेचे संविधान इ.स. १७८९ मध्ये अमलात आले होते . ते लिखित असून
त्यात केवळ ७ कलमांचा समावेश आहे . परंतु सुमारे २२५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला
असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो आहे .
इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा
जुना इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे
नियम या देशात लिखित नसून संकेत, रूढी, परंपरेच्या
स्वरूपांत आढळतात. तरीपण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. १२१५ साली झालेल्या
मॅग्नाकार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान तयार
होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे
संविधान प्रामुख्याने अलिखित आहे हे लक्ष्यात ठेवा .
______________________________________________
किती अभिमानास्पद बाब आहे ही।
• आपले भारतीय संविधान सभेत चर्चा व
विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले.
संविधान तयार करतांना विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य असलेल्या सूचनांचा स्वीकार हे सभेच्या कामकाजाचे खरे
वैशिष्ट्य होते.संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस इतका कालावधी लागला.
• मूळ संविधानात एकूण समाविष्ट करण्यात
आलेले २२ भाग व एकूण
३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे यांचा समावेश करण्यात आलेला होता.
______________________________________________
माहीत आहे का तुम्हांला ?
डॉ.
राजेंद्रप्रसाद, श्री.पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री. सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, श्रीमती .सरोजिनी नायडू, श्री.जे.बी. कृपलानी, राजकुमारी
कौर , श्रीमती . दुर्गाबाई देशमुख ,श्रीमती . हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर
सदस्य होते. बी.एन.राव या कायदेतज्ज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार
म्हणून नेमणूक झाली होती.

