दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

आदर्श राज्यकर्ता / 7 वी / इतिहास


आदर्श राज्यकर्ता / 7 वी / इतिहास 

             या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून  आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.  टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.


आपल्या इतिहासातील महत्वपूर्ण गोष्टी

माहीत आहे का तुम्हांला ?

शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी 'बुधभूषण' या ग्रंथात केलेले वर्णन लक्षणीय आहे. ते पुढीलप्रमाणे :

 

'कर्नाटक देशापासून ते बागलाण देशापर्यंत शत्रूंना अभेदय दुर्गच, असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारांच्या रांगांवर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांसभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्यात, ते विजयी आणि सर्व राजांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज राहिले.'