दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

बुधवार, २६ मे, २०२१

1.भारत देश महान / 8 वी /मराठी

 

1.भारत देश महान  / 8 वी /मराठी

 कवितेचा भावार्थ :-

या कवितेचा अर्थ समजून घेऊ व मग टेस्ट सोडूया

देशवासीयांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात.भारतवासी जनहो, चला आपण आता 'भारत देश महान आहे, हे गीत आपण एकमुखाने गाऊया. आपल्या भारताची थोरवी एकजुटीने,एकमुखाने  गाऊया. ।।धृ.।।

माझ्या भारतभूमीच्या मस्तका वर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे डोलत आहेत. (जणू हिमशिखरांचा मुकुट भारतभूम मस्तकावर धारण केला आहे.) गंगा, यमुना व गोमती या नदया आपल्या पवित्र पाण्याने जणू भारतभूमिला अंघोळ घालत आहेत. ॥१॥

पुढे कवी म्हणतात की भारत भूमीचा हा नवीन इतिहास महान  बलिदानाचा, शौर्याचा व पराक्रमाचा आहे. राष्ट्राभिमान जागृत करणारा व समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे. ॥२॥

आपल्या  या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले, स्वातंत्र्य संग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण जे लढले व पवित्र झाले; त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगले आहे. त्याची ग्वाही आपल्याला  उंच फडकत असलेला हा  आपला  राष्ट्रीय ध्वज देत आहे. आपले हे  निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहो. ||||

या कवितेचे कवी: माधव विचारे

 

    या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.