दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शनिवार, १० एप्रिल, २०२१

Dhartichi amhi lekare /धरतीची आम्ही लेकरं I चौथी मराठी कविता

Dhartichi amhi lekare
इयत्ता चौथी कविता
१ ) धरतीची आम्ही लेकरे

धरतीची आम्ही लेकरे या कवितेवर आधारीत ऑनलाईन टेस्ट सोडवा.
आम्ही धरतीची लेकर आहोत . आम्ही नशीबवान आहोत . आम्ही रानावनात गात रानोमळी फिरत आहोत वरील प्रश्न वहीवर लिहून घ्यावे .पाठाचे पूर्ण वाचन करावे .

कथा :- संपत्तीचा लोभ

एकदा एक  साधू एका जंगलातून जात होते . जंगलातून जात असताना अचानक त्यांना  एक मस्तक आणि पोलादी पाय असणारा एक विचित्र माणूस समोर आला. त्या माणसाला बघून साधूला थोड़े आश्चर्यच वाटले. आता पर्यंत या जंगलातून साधूने खूप वेळा भ्रमंती केलेली  होती; पण अशा प्रकारचा  विचित्र माणूस भेटेल, अशी त्यांना  शंकासुद्धा आली नव्हती.

                 कुतूहल म्हणून साधूने त्या माणसाला त्याच्या आहाराविषयी विचारले. यावर तो म्हणाला, मी  जमिनीचे भूखंड खातो आणि मी  समुद्राचे पाणी पितो. तसा मी अत्यंत सुखी आहे. सर्व प्रकारच्या  भौतिक सोई सुविधा मला उपलब्ध आहेत. माझ्या  आहारासाठी मी आज अनेक भूखंड माझ्यासाठी आरक्षित केलेले आहेत, पण तरीही मला माझ्या  भविष्याची चिंता छळत आहे.

यावर साधूने विचारले, इतकी सारी सुखं तुझ्या पायाशी लोळत असताना तुला भविष्याची चिंता का बरं वाटावी? तो माणूस म्हणाला, आज जरी मला खूप सारी  जमीन व अमर्याद पाणी  माझ्यासाठी  उपलब्ध असले तरी हे सारे गिळंकृत केल्यानंतर काय खाऊ ? हा प्रश्न मला सतत छळत असतो.

 गोष्टीचे तात्पर्य : माणसाला सत्ता- संपत्ती आणि सन्मान यांचा लोभही असाच अमर्यादित असतो, तो आयुष्यभर  संपत नाही.