आम्हालाही हवाय मोबाईल !
माझा एकदा ऐक ना आई .मी आता मोठी झाले ,असं तू नाही का म्हणालीस? मग मलाही सगंळ्यासारखाच छान मोबाईल पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच असतो ना फोन? गंमतच आहे . ताईने मागितला की लगेच मिळतो फोन .दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल .बाबांकडे दोन-दोन मोबाईल असतात अन आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ?
मोबाईल साठी ची हि नाट्यछटा छान आहे बर का ती वाचून त्याप्रमाणे ती साभिनय करा. व खालील टेस्ट सोडवा .
