दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

बुधवार, १४ जुलै, २०२१

Bridge Course| सेतू अभ्यासक्रम|तिसरी |15 जुलै

 Bridge Course| सेतू अभ्यासक्रम|तिसरी |15 जुलै   

 


सेतू अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचा विशेष उपक्रम असून निर्मितीचे व वितरणाचे सर्व अधिकार त्त्यांचे आहेत .सदरील सेतू अभ्यासावरील कृती,अभ्यास करतांना किंवा अवघड भाग समजून घेतांना आपल्या पालकांची/शिक्षकांची/अभ्यास मित्रांची  मदत घ्यावी व  Diksha App चावापर करावा.हा सेतू अभ्यास आपण वहीवर,pdf प्रिंट काढून सोडविणे अपेक्षित आहे.या उपक्रमाचा आपल्याला अभ्यासात निश्चितच फायदा होईल.सर्वांना शुभेच्छा !

उजव्या कोपऱ्यातील बाणावर क्लिक करा व डाउनलोड करा.

 

पहिली

दुसरी

तिसरी

चौथी

क्लिक करा  

क्लिक करा

क्लिक करा  

क्लिक करा  

 

 

 

पाचवी

सहावी

सातवी

आठवी

क्लिक करा

क्लिक करा

क्लिक करा

क्लिक करा

 

 

 

बोधकथा :- कष्टाची कमाई

    एका गावात  शेठजींचा अज्जू नावाचा एक  मुलगा होता , अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला.

       शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्‍याच दिवशी‍ त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले.एक तरी  पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्‍या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला.

         हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्‍या कष्टाची किंमत कळली.

          तात्‍पर्य :- स्वकष्टाची कमाई... तीच खरी कमाई  !!