Bridge Course|आजचा सेतू अभ्यासक्रम | आठवी |14 जुलै
सेतू अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचा विशेष
उपक्रम असून निर्मितीचे व वितरणाचे सर्व अधिकार
त्त्यांचे आहेत .सदरील सेतू अभ्यासावरील कृती,अभ्यास करतांना किंवा अवघड
भाग समजून घेतांना आपल्या पालकांची/शिक्षकांची/अभ्यास मित्रांची मदत घ्यावी व Diksha App चावापर करावा.हा सेतू अभ्यास आपण वहीवर,pdf प्रिंट काढून सोडविणे अपेक्षित
आहे.या उपक्रमाचा आपल्याला अभ्यासात निश्चितच फायदा होईल.सर्वांना शुभेच्छा !
उजव्या कोपऱ्यातील बाणावर क्लिक करा व डाउनलोड करा.
|
दुसरी |
तिसरी |
चौथी |
|
गोष्ट वाचा :- जंगली पोपट
एक दिवस गबरू नावाचा एक शिकारी बाहेर पडला. सकाळची
संध्याकाळ झाली, पण त्याला शिकार काही मिळाली नाही. शेवटी माघारी परतताना
वाटेत त्याला एक मोठे घनदाट जांभळाचे झाड दिसले. त्यावर बरेच पक्षी बसले होते.
गबरूने आपले जाळे फेकले. काही पक्षी उडाले, पण काही जाळ्यात फसले. त्यात
एक सुंदर पोपटसुद्धा होता. तो घाबरला होता. पोपट गबरूला म्हणाला, 'मी तर इवला इवला पक्षी. मला मरू नको. मला सोडून दे. माझीसुद्धा छोटी-छोटी बाळं
आहेत. माझी वाट पाहत असतील.' गबरूने पोपटाची आर्जवं ऐकली. पहिल्यांदाच एखाद्या शिकारीवर
त्याला दया आली. त्याने विचार केला, 'याला विकून टाकू.
त्यामुळे त्याचा जीव वाचेल आणि मला दाम देखील मिळेल. मग
त्याने पोपटाला बाजारात नेले. सुंदर पोपटाला एका शेठने विकत
घेतले. त्याच्यासाठी एक पिंजरा आणून दुकानाबाहेर दरवाजाला
त्याला संध्याकाळी घरी असे आणि दुसऱ्या
दिवशी दुकानात आणत असे. काही दिवसांनी त्याला पोपटाचा
कंटाळा आला. एक दिवस शेठ पिंजरा सोबत घेऊन भाजीमंडईत
गेला. तिथे पोपटाची दृष्टी मिरच्यांच्या ढिगाऱ्यावर पडली. पोपट ओरडला, 'मिरची.. मिरची.'
भाजी विक्रेत्याला पोपटाचे बोल आवडले. त्याने पोपटाला विकत
घेण्याचा निश्चय केला. भाजीवाल्याने वीस टक्क्याला पोपट विकत घेतला. त्याने
पिंजऱ्यासह पोपटाला घरी आणले. त्याच्या घरात त्याची बायको आणि मुलगा असे दोघेच
होते. मुलाचे नाव बिरजू होते. एक दिवस नगरचा राजा नगरीत भ्रमण करत होता. काही
दिवसांनी शेजारच्या राजाशी युद्ध होणार होते. शत्रू राजाने युद्ध पुकारले होते.
राजाच्या स्वागताला प्रजा रस्त्यावर उभी होती. र बिरजूसुद्धा आपल्या पोपटासह
आपल्या दारात उभा होता. राजा जवळ येताच पोपट म्हणाला, 'राजाचा विजय असो... राजाचा विजय असो.' पोपटाची गोड शुभवाणी ऐकून
राजा आश्चर्यात पडला. पोपट राजाच्या हातात आल्यावर म्हणू लागला, 'माझा मालक राजा आहे... माझा मालक राजा आहे. '