दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

गुरुवार, १५ जुलै, २०२१

बोधकथा:- टिळकांची सत्यनिष्ठा

 बोधकथा:- टिळकांची सत्यनिष्ठा

ही घटना बाळ गंगाधर टिळकांच्या लहानपणीची आहे. एकदा ते घरी एकटेच बसलेले होते. अचानक त्यांना सोंगट्या खेळण्याची इच्छा झाली. परंतु एकटे सोंगट्या कसे खेळणार? म्हणून त्यांनी घरातील खांबाला आपला सोबती बनवले. ते उजव्या हाताने खांबाकडून तर डाव्या हाताने स्वतःकडून खेळू लागले आणि अशा प्रकारे

खेळता-खेळता ते दोन वेळा हरले.आजी लांबूनच हे दृश्य पाहत होती. हसत हसत ती म्हणाली,'हात् तुला काय म्हणू? एका खांबाकडून हरलास?" टिळक म्हणाले, "हरलो तर काय झाले? माझा उजवा हात खांबाच्या स्वाधीन होता आणि मला उजव्या हाताने खेळण्याची सवय आहे म्हणून खांब जिंकला, नाहीतर मीच जिंकलो असतो."

किती अपूर्व होता टिळकांचा न्याय? ज्या हाताने चांगल्या

प्रकारे खेळू शकत होते त्या हाताने खांबाकडून खेळले आपण

हरल्यानंतर सहजगत्या हार देखील स्वीकार केली !महापुरुषांचे लहानपण देखील नैतिक गुणानी युक्त असते.

अशाच प्रकारे एकदा सहामाही परीक्षेत टिळकांनी सर्वच

प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहून टाकली. जेव्हा परीक्षेचा निकाल

घोषित झाला, तेव्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीसे

वाटली जात होती. जेव्हा टिळकांच्या वर्गाची पाळी आली, तेव्हा

पहिला नंबर टिळकांचा घोषित केला गेला. शिक्षक जेव्हा

टिळकांना बोलावून बक्षीस देऊ लागले तेव्हा टिळक रडू लागले.हे बघून सर्वाना. मोठे आश्चर्य वाटले. शिक्षकांनी टिळकांना

रडण्याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, "गुरुजी ! खरी गोष्ट

अशी आहे की सर्वच प्रश्नांची उत्तरे मी लिहीली नाहीत. आपण

सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहील्यामुळे मला बक्षीस देत आहात.

परंतु एक प्रश्नाचे उत्तर मी माझ्या मित्राला विचारून लिहीले होते.म्हणून बक्षीसाचा खरा हक्क माझा नाही.' शिक्षक प्रसन्न होऊन टिळकांना छातीशी लावून म्हणाले,तुझा पहिल्या नंबरसाठी बक्षीस घेण्याचा हक्क बनत नाही. परंतु हे बक्षीस आता तुला तुझ्या खरेपणाबद्दल देत आहोत. "अशी सत्यनिष्ठ, न्यायप्रिय व प्रामाणिक मुलेच पुढे महान कार्य करू शकतात! जाऊन "प्रिय विद्यार्थ्यांनो! तुम्हीच भावी भारताचे भाग्यविधाते आहात. म्हणून आत्तापासूनच आपल्या जीवनात सत्यपालन, प्रामाणिकपणा, संयम, सदाचार न्यायप्रियता असे गुण विकसित करून आपले जीवन महान बनवा. तुमच्यामधूनच कोणी लोकमान्य टिळक तर कोणी सरदार वल्लभभाई पटेल, कोणी छ. शिवाजी तर कोणी महाराणा प्रतापसारखे बनू शकता. तुमच्यामधूनच कोणी ध्रुव-प्रह्लाद, मीरा मदालसाचा आदर्श पुन्हा स्थापित करू शकता.

बोध- सत्याचा नेहमी विजय होतो.



जन्म २३ जुलै १८५६- ०१ऑगस्ट १९२०