दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

गुरुवार, ३ जून, २०२१

७.मुग्धा लिहू लागली / तिसरी /मराठी /टेस्ट-२


 ७.मुग्धा लिहू लागली / तिसरी /मराठी /टेस्ट-२

                    या पाठाचे काळजीपूर्वक वाचन करा .पाठचा अभ्यास करा व या पाठावर आधारित खालील ऑनलाईन चाचणी सोडवा .चांगले गुण मिळेपर्यंत प्रयत्न करा .टेस्ट मनोरंजक असून बनवलेली असून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.टेस्ट २०गुणांची असून त्यामध्ये १० प्रश्न आहेत .सर्वांना टेस्ट सोडवण्यासाठी शुभेच्छा !


वाचा.

मुलांनो, सगळे भरभर चाला. परिपाठाच्या आधी केंद्रशाळेत पोचायला पाहिजे. स्पर्धा सुरू होतील लगेचच. पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या. केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतल्या मुलांना घेऊन निघाल्या होत्या. मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणलीय. मी अंड्याची पोळी आणि चपाती आणलीय जया म्हणाली. माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे. सायना. अरेऽऽ माझा डबाच घरी विसरला. आता मी काय खाणार ? मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक. अभिजीत चिंतेने म्हणाला. का? आम्ही आहोत की. सायना आणि जया एकदम बोलल्या. आणि मी पण. मयूर म्हणाला. बोलत बोलत सगळे केंद्रशाळेच्या दारात आले. बाईंनी हुश्श केले.


 अवतरण चिन्हांचा वापर करून हाच प्रसंग असे “....................” चिन्ह देऊन लिहिला आहे. तो वाचा.आता तुमच्या वर्गात कुणीही बोललेली चार ते पाच “ ______ " असे चिन्ह वापरून लिहा.

मुलांनो, सगळे भरभर चाला. परिपाठाच्या आधी केंद्रशाळेत पोचायला पाहिजे. स्पर्धा सुरू होतील लगेचच.पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या. केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतील मुलांना घेऊन निघाल्या होत्या.मयूर म्हणाला, “मी डब्यात गुळाची पोळी आणलीय.' “मी अंड्याची पोळी आणि चपाती आणलीय." जया म्हणाली. 'माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे." सायना. "अरेऽऽ माझा डबाच घरी विसरलाय. आता मी काय खाणार? मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक." अभिजीत चिंतेने म्हणाला. का? आम्ही आहोत की." सायना आणि जय एकदम बोलल्या. आणि मी पण. मयूर म्हणाला.बोलत बोलत सगळे केंद्रशाळेच्या दारात आले. बाईंनी हुश्श केले.