संधीचा
फायदा
एकदा, एका मंदिराच्या
पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते
पुजाऱ्याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना
सांगतो, की त्याचा देवावर
विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात
वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजाऱ्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो
पुजाऱ्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या
वेळाने एक होडी येते; पण
तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजाऱ्याकडे शिडी टाकतात, पण तो तेही
नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान
गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार
करतो, की त्याचा एवढा
भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही.
• तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक
माणूस, एक होडी आणि एक
हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजाऱ्या आपल्या
हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.
तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण
ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.
