शब्द व आश्वासन
हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री,एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला.
त्याने त्याला विचारले, "तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का?
तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"
तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे.
"अब्जाधीश म्हणाला,"थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो"
थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील" अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला..
सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्याची आठवण झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला.
परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता.
अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली.
त्याने ती चिठ्ठी वाचली.
त्यात लिहिले होते, “साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती.
परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली..
👉 तात्पर्य :
जर आपण एखाद्याला दिलेला शब्द,आश्वासन,वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. त्याला आशेवर ठेऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्या एखाद्या व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो....!_