दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

बुधवार, २६ मे, २०२१

13.विद्याप्रशंसा / 8 वी /मराठी

 

13.विद्याप्रशंसा / 8 वी /मराठी

                 या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.

९. विद्याप्रंशसा या कवितेचा भावार्थ / ८वी मराठी

                       विद्येची थोरवी सांगताना कवी म्हणतात या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ लाभले आहे. जी . विदयेमुळे प्राप्त होत नाही, अशी गोष्ट जगामध्ये नाही. विदयेमुळे मनुष्याला कोणतीही गोष्ट मिळू शकतात . ॥१॥

 

ज्ञान व विद्या अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्यामुळे कधीही कमी होत नाही, उलट ती सतत वाढतच राहते. विदया ही अक्षय आहे. अशी ही एकच विदयासंपत्ती आहे. तिच्यामध्ये असलेला हा  विलक्षण गुण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. ||||

              जगामध्ये तऱ्हेतऱ्हेचे, निरनिराळे बेसुमार असे रत्ने, हिरे, माणके, मोती व सोने यांचे अलंकार आहेत. पण विदयेसारखा शोभिवंत अलंकार दुसरा  एकही नाही. विदया अलंकार एकमेव व अद्वितीय असा आहे. ||||

               या सर्व पृथ्वीतलावर, सर्व जगात विदयेसारखा कल्याणकारी व शुभचिंतक मित्र नाही. ज्याला विदया अनुकूल आहे, वश' आहे, त्याला नेहमी कशाचीही कमतरता भासत नाही. ॥४॥

              विद्या ही गुरूप्रमाणे उपदेश करते. संकटात मार्ग दाखवते. संकट कसे निवारण करायचे याचे उपाय सुचवते. कल्पतरू जसा तुम्ही इच्छिलेले फळ देतो, यशदायी ठरतो, त्या कल्पतरूप्रमाणे विद्या ही तुमची मनोकामना पूर्ण करते. ।।५।।

               अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व सर्व दुःखे हरण करणारी ही विद्यादेवता आहे. तिची मनोभावे नेहमी उपासना करावी. अनन्यभावाने तिला शरण जावे. तिची खूप साधना करावी. ॥६॥